राज यांच्या भाषणानंतर राजकीय नेते, सर्वसामान्य तसंच कलाकार मंडळींच्याही प्रतिक्रिया येत आहेत. मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांची या संदर्भातली पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. ‘आजचं राजसाहेबांचं भाषण हे बाळासाहेबांची आठवण करून देणारं. बऱ्याच काळानं धारदार भाषण .हिंदूंची प्रखर बाजू मांडणारं भाषण.धन्यवाद राजसाहेब’, असं पोंक्षे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
‘राज यांचं भाषण हे बाळासाहेबांची आठवण करून देणारं’, अभिनेत्याची पोस्ट चर्चेत – sharad ponkshe share post on raj thackeray thane speech
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी ठाण्यात उत्तरसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत राज यांनी मनसैनिकांना संबोधित केलं. या सभेतराज यांनी मशिदींवरील लाऊडस्पीकरबद्दल भूमिका मांडली आहे.