bidkin police station: घराकडे पाहतो म्हणून बाप-लेकांनी लोखंडी रॉडने बेदम मारलं, अखेर तरुणाने गमावला जीव – looking at the house the father and son beat the young man
औरंगाबाद : पैठण तालुक्यातील ७४ जळगाव येथे एक प्रचंड धक्कादायक प्रकार समोर आला असून, घराकडे टक लावून का पाहतो या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एकाला जीव गमवावा लागला आहे. बाप लेकाकडून लोखंडी गजाने झालेल्या या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला आहे. संतोष प्रकाश एरंडे (रा.७४ जळगाव ता. पैठण) असे मृत तरुणाचे नाव आहे. विशेष म्हणजे या मारहाणीचा एक व्हिडिओसुद्धा समोर आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील ७४ जळगाव येथील संतोष प्रकाश एरंडे या युवकाला शुक्रवारी सायंकाळीच्या वेळी गावातीलच रावसाहेब गटकळ, जीवन गटकळ व वैभव गटकळ या तिघांनी आमच्या घराकडे टक लावून का पाहतो म्हणून लोखंडी गजाने बेदम मारहाण केली होती. विशेष म्हणजे संतोषला मारहाण होतांना त्याचा ओरडण्याचा आवाज ऐकून त्याची आई मंदाबाई एरंडे धावत पळत मंदिराजवळ गेली. त्याला का मारता असे विचारले असता आरोपींनी त्यांनाही ढकलून देत लोखंडी गजाने मुलांच्या डोक्यावर हातपायावर, पाठीवर जबर मारहाण करून जखमी केल्याची तक्रार मंदाबाई यांनी दिली आहे. Jitendra Awhad: राज ठाकरेंमध्ये वर्णद्वेष आणि जातीयवाद ठासून भरल्यामुळेच ते इतरांना रंगरुपावरून हिणवतात: जितेंद्र आव्हाड संतोष मदतीसाठी ओरडत राहीला…
संतोषला रावसाहेब गटकळ आणि त्यांच्या दोन मुलांनी गावातील खंडोबा मंदिर जवळ गाठत हातातील लोखंडी गजाने मारहाण करायला सुरुवात केली. बेदम मारहाण झाल्याने संतोष जमिनीवर कोसळला, अंगावर गजाने मारहाण केली जात असताना तो जोरजोरात ओरडत होता. पण आजूबाजूला उभे असलेल्या लोकांपैकी कुणीही त्याच्या मदतीला आलं नाही. संतोषचा आवाज ऐकून त्याची आई धावून आली आणि तिने मुलाला बाप लेकांच्या तावडीतून सोडवत रुग्णालयात दाखल केलं. पण मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या संतोषचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर याप्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून, सहायक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार जगदीश मोरे, हवालदार सोमनाथ तांगडे हे तपास करीत आहेत.
संतोषला करण्यात आलेल्या बेदम मारहाणीचा एक ३१ सेकंदाचा व्हिडीओ सुद्धा समोर आला आहे. ज्यात संतोष जमिनीवर कोसळलेला दिसत असून, जोरजोरात ओरडत आहे. तर त्याच्या आजूबाजूला दोन तीन जण हातात गज घेऊन उभे असून, त्याला मारहाण करताना सुद्धा दिसत आहे. तर संतोषची आई मुलाला वाचवण्यासाठी धावत आल्याचं सुद्धा या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.