पुणे न्यूज मराठी: पुण्यात स्पा सेंटरमध्ये सुरू होता वेश्या व्यवसाय, पोलीस खातरजमा करण्यासाठी गेले अन्… – prostitution business was started under the name of spa center in pune
पुणे : मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करवून घेणाऱ्या “ओरा स्पा” सेंटरच्या मॅनेजरला सामाजिक सुरक्षा विभागाच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. यामध्ये असणाऱ्या सहा पीडित महिलांची यावेळी सुटका करण्यात आली आहे. औंध येथे ही कारवाई करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहर हद्दीमध्ये मसाजसेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली राज्यातील तसेच परदेशातील मुली ठेवून त्यांना पुरुष गिऱ्हाईकांना मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याची माहिती पोलिसांना हाली लागली होती. यानंतर पोलिसांकडून बनावट गिऱ्हाईक पाठवून खातरजमा करण्यात आली. त्यानंतर सामाजिक विभागाच्या गुन्हे शाखेने औंध परिसरातील ओरा स्पा सेंटरवर छापा टाकून मॅनेजरला अटक करण्यात केली. ‘मी ज्याच्यासाठी तुम्हाला सोडलं तो…’, प्रेमविवाह करणाऱ्या तरुणीची आत्महत्या, सुसाईड नोट वाचून हादराल यात मॅनेजर सागर श्याम पवार वय-३२ वर्षे, रा. गवळीवाडा, लोणावळा, ता. मावळ जि. पुणे. यास अटक केली असून गुन्ह्यातील आरोपी मनिष ईश्वर मुथा, रा. कोढवा, पुणे, राहुल जिगजिनी यांचा शोध सुरू आहे. तर हा आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत असल्याचं सांगण्यात येत आहे.
हे आरोपी मसाज सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता येणाऱ्या महिलांकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करवून घेत होते. त्यांच्या ताब्यातील दोन परराज्यातील भारतीय महिलांची आणि थायलंड या देशातील एकूण चार महिलांची सुटका करण्यात आली आहे.
या मारलेल्या छाप्यात ८१ हजार ८९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी चतुशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी अधिक तपास चतुशृंगी पोलीस करत आहेत.
BBA