राज ठाकरे यांनी काल ठाणे येथील उत्तर सभेत शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी राज ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील, छगन भुजबळ यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. आता शरद पवार १ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. शरद पवार यांच्या सभेकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह राजकीय क्षेत्राचं लक्ष लागलं आहे.
शरद पवार कोणत्या विषयावर बोलणार?
राज्यातील राजकीय स्थिती, महाविकास आघाडी सरकारची कामगिरी, किरीट सोमय्या आयएनएस विक्रांत प्रकरण, एसटी कर्मचारी यांचा संप, राज ठाकरे यांनी नास्तिक असल्याची केलेली टीका यासंदर्भात शरद पवार काय बोलतात हे पाहावं लागेल. शरद पवार यांनी राज ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिलं होतं. राज ठाकरे एक व्याख्यान घेतात आणि महिना महिना गायब असतात, अशी टीका शरद पवार यांनी केली होती. या टीकेला राज ठाकरेंनी ठाण्यात झालेल्या सभेत प्रत्युत्तर दिलं होतं. आता, दुपारी १ वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेत शरद पवार काय बोलतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.