Live अपडेट्स…
>> दिल्लीत दिवसभरात ९३ नवे रुग्ण आढळले, हे सर्व रुग्ण निझामुद्दीन मरकझशी संबंधित.
>> देशभरात करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ५२७४ वर. तर १४९ जणांचा मृत्यू झाला आहे. या बरोबरच एकूण ४०२ रुग्ण बरे झाले आहेत.
>> बिहार: ९ वर्षीय मुलाला करोनाची लागण. हा मुलगा मदरशात शिकण्यासाठी गेला होता. मदरशातील २४ लोकांनाही केले क्वारंटीन.
>> राजस्थान: जयपूरमध्ये आढळले आणखी नवे ६ रुग्ण, जयपूरमध्ये कालच्या दिवसभरात २१ नवे रुग्ण आढळले. जयपूरमध्ये रुग्णांची संख्या १२४ वर.
>> तेलंगणमध्ये करोनाचे ४९ नवे रुग्ण आढळले. या बरोबर तेलंगणमध्ये रुग्णांची संख्या ४५३ वर पोहोचली. तर राज्यात एकूण ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
>> नमस्कार, देशभरातील विविध राज्यांमधील करोनाबाबतची स्थिती जाणून घा, मटा ऑनलाइनचे लाइव्ह अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या सोबत राहा…
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times