पिंपरी चिंचवड : पत्नीचे एका व्यक्तीसोबत विवाहबाह्य अनैतिक संबंध असल्याच्या रागातून एका महिलेचा धारदार शस्त्राने वार करत खून झाल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. अश्विनी सचिन काळेल (२५) असे मृत महिलेचे नाव असून अश्विनीचे तिच्या प्रियकरासोबत विवाहबाह्य अनैतिक संबंध होते आणि याच गोष्टीचा राग आल्याने मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास महिलेचा खून झाल्याने पिंपरी-चिंचवड परिसरात खळबळ उडाली आहे.

आरोपी सचिन काळेलची पत्नी अश्विनी काळेलचे तिच्या प्रियकरासोबत अनैतिक संबंध होते. या सर्व प्रकाराबाबत अश्विनीच्या कुटुंबीयांना आणि सासरच्या मंडळींना सर्व कल्पना होती. घरच्यांनी आणि सासरच्यांनी विरोध करूनही अश्विनी पतीला सोडून तिच्या प्रियकरासोबत राहत होती. आरोपी पती सचिन काळेल याने पोलिसांना या सर्व प्रकाराबाबत माहिती दिली होती. पोलिसांनी प्रकरणाची दखल घेत अश्विनीला तिच्या पतीसोबत किंवा तिच्या कुटुंबीयांकडे राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र, अश्विनीने तिच्या प्रियकरासोबत राहणे चालूच ठेवले.

पुण्यात स्पा सेंटरमध्ये सुरू होता वेश्या व्यवसाय, पोलीस खातरजमा करण्यासाठी गेले अन्…
अश्विनीच्या कुटुंबीयांनी सुद्धा अश्विनीला वारंवार विनंती करत घरी परत येण्याची विनंती केली होती. अश्विनीच्या सासरचे मंडळी तसेच पती सचिन काळेल यानेसुद्धा अश्विनीला वारंवार विनंती करूनसुद्धा अश्विनी तिच्या प्रियकरासोबत राहणं बंद करत नव्हती.

‘मी ज्याच्यासाठी तुम्हाला सोडलं तो…’, प्रेमविवाह करणाऱ्या तरुणीची आत्महत्या, सुसाईड नोट वाचून हादराल
“अश्विनीचे तिच्या प्रियकरासोबत अनैतिक संबंध होते व ती तिच्या पतीच्या इच्छेविरुद्ध तिच्या प्रियकरासोबत राहत होती याची तक्रार आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही अश्विनीला समज दिली होती. मात्र, तिने दुर्लक्ष केले. मंगळवारी रात्री अश्विनी आणि तिचा पती सचिन काळे यांनी शारीरिक संबंध ठेवले आणि सकाळी पाच वाजताच्या सुमारास दोघांमध्ये भांडण झालं आणि हा वाद पुढे जाऊन इतका चिघळला की सचिनने उशीने तिचे तोंड दाबत चाकूने गळा कापून तिचा खून केला” अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक राठोड यांनी दिली असून आरोपी सचिन सचिन काळेल याला पोलिसांनी अटक केली आहे.

महिलेची हुशारी बघा! महावितरणाला लावला दोन लाखांचा चुना, मीटरमध्ये असं काही केलं की…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here