अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील आमदार रोहित पवार आपल्या संयमी आणि अभ्यासू स्वभावासाठी ओळखले जातात. राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील मुद्द्यांवरही ते सतत व्यक्त होत असतात. सयंमी शब्दांत पण आकडेवारी आणि मुद्देसुदपणे केंद्र सरकारवरही त्यांनी अनकेदा टीका केली आहे.

मात्र, अलीकडेच जामखेडमध्ये झालेल्या राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमात त्यांचे वेगळेच स्वरूप मतदारसंघातील लोकांना पहायला मिळाले. या मतदारसंघात केंद्र-राज्य सरकारच्या कामाचे श्रेय घेण्यावरून वाद सुरू आहे. याशिवाय एकमेकांविरूद्धची भाषणे आणि निवेदने यावरूनही वातावरण तापले आहे. याच मुद्यांचा पवार यांनी आपल्या भाषणात आक्रमकपणे समाचार घेतला.

‘शरद पवारांच्या घरावरील हल्ला भाजपचं षडयंत्र असेल तर मी खासदार पदाचा राजीनामा देईन’
भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांच्यासोबत भाजपचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांच्यावरही नाव न घेता त्यांनी टीका केली. मार्चमध्ये केलेल्या एका आंदोलनाच्यावेळी पोटरे यांनी केंद्र सरकारच्या कामाचे श्रेय घेण्यावरून पवार यांच्यावर टीका केली होती. त्याला रोहित पवार यांनी उत्तर देताना आपल्या कार्यकर्त्यांनाही वेळप्रसंगी आक्रमक होत परस्पर अशा प्रकारांना उत्तरे देण्यास सांगितले आहे.

दरम्यान, पोटरे आणि पवार यांच्यातील या आरोपप्रात्यारोपांची सध्या कर्जत-जामखेडमध्ये चर्चा आहे. यावेळी रोहित पवार यांनी मी राजकारणासाठी काम करत नसून समाजाच्या कल्याणासाठी करतो. हिम्मत असेल तर मागून नाही पुढे येऊन बोला, असं आवाहनही यावेळी रोहित पवार यांनी केलं. इतकंच नाहीतर त्यांनी सोशल मीडियावरूनही विरोधकांना उत्तर दिलं.

महिलेची हुशारी बघा! महावितरणाला लावला दोन लाखांचा चुना, मीटरमध्ये असं काही केलं की…
‘मी इतकी कामं करतो की ती सोशल मीडियावर शेअर करू शकतो. तुम्ही कामच करत नसल्यामुळे तुमच्याकडे सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी काही नाही’ असंही रोहित पवार म्हणाले. यावेळी त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांनाही सुनावलं. ‘एका दगडावर पाय ठेवा. दोन दगडांवर पाय ठेवून काम करू नका. आपल्यावर कोणी टीका केली तर तुम्हीही त्यांना उत्तर द्या’, अशा सूचना रोहित पवार यांनी दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here