मुंबई : कॉमेडीक्वीन भारती सिंग सध्या आई होण्याचा आनंद घेत आहे. भारतीला ३ एप्रिलला मुलगा झाला तेव्हापासून तिच्यावर चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भारती आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया यांनी भारतीच्या बेबीबम्प फोटोशूटपासून ते डिलिव्हरी पेन्सपर्यंत अनेक गोष्टी सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. त्यामुळेच आता भारती सिंगच्या मुलाचा चेहरा पाहण्यासाठी तसंच त्याचं नाव काय ठेवलं, हे जाणून घेण्यासाठी भारतीचे चाहते आतूर आहेत.

अजून तरी भारतीने तिच्या मुलाचं पाळण्यातील नाव ठेवलं नसलं तरी भारती आणि हर्षने बाळाचं टोपणनाव ठेवलं आहे. भारतीचं बाळ इतकं गुटगुटीत आहे की ते बघून भारती आणि हर्ष त्यांच्या चिमुकल्याला गोला याच नावाने हाक मारत आहेत. फायनल नाव ठेवेपर्यंत गोला याच नावाने लिंबाचिया फॅमिलीतल्या या नव्या पाहुण्याचे लाड पुरवले जात आहेत.

‘मी आता खूप थकले आहे…’ असं म्हणत अभिनेत्रीनं डिलिट केल्या सर्व इन्स्टा पोस्ट

भारती सिंग हर्ष

आई ही आईच असते. मग ती झोपडीत राहणारी, बाळाला पोटाशी धरून कष्ट करणारी असो किंवा हजारो चाहते असलेली सेलिब्रिटी कलाकार असो. बाळासाठी ती कित्येक रात्री जागून काढते आणि डोळे मिटल्यावरही तिला तिच्या बाळाचाच चेहरा दिसतो. आई झाल्यानंतर कोणत्याही स्त्रीच्या भावना या सारख्याच असतात. मग याला कॉमेडी क्वीन भारती सिंग हीदेखील कसा काय अपवाद ठरेल बरं.

गोंडस मुलाला जन्म दिल्यानंतर भारती सिंग आता घरी तिच्या बाळासोबत वेळ घालवत आहे. बाळासोबतचा अनुभव शेअर करत भारतीने तिच्या लाइफ ऑफ लिंबाचिया या युट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. भारतीने हॉस्पिटलपासून घरापर्यंतचा बाळाचा कार प्रवासही शेअर केला आहे. घरी आल्यावर बाळाच्या स्वागताचे क्षणही या व्हिडिओमध्ये आहेत. भारती, हर्ष आणि बाळाचं औक्षण करण्यात आलं, तेही व्हिडिओत आहे.

लाखो प्रेक्षकांना खळखळून हसवणारी भारती या व्हिडिओमध्ये खूपच भावुक झाल्याचं दिसून येत आहे. ती म्हणतेय, ‘मी आणि हर्ष बाळ आल्यापासून खूपच जबाबदारीने वागत आहोत. बाळाची जरा जरी हालचाल झाली की आम्ही दोघं एकत्रच उठतो. गेल्या पाच वर्षात आम्हाला एकाच वेळी जाग येण्याचं कारण म्हणजे फक्त आमचा हा गोला आहे. खरं तर आम्हाला मुलगी हवी होती, पण गोलाचं आम्ही स्वागतच करतो. हर्ष तर त्याच्यापासून जराही लांब जात नाही. गोला दर दोन तासांनी उठतो त्यामुळे आम्हालाही उठावं लागतं. पण याचा आम्हाला अजिबात त्रास होत नाही. सतत त्याची काळजी वाटते. आता मला कळतंय की आपल्या आईवडिलांना आपली इतकी काळजी का वाटायची? गोला कधीही उठेल या काळजीने मला झोप लागत नाही आणि डोळे मिटले तरी त्याचाच चेहरा डोळ्यासमोर येतो.’

आई कुठे काय करते: देशमुखांच्या बंगल्यावर संजनानं सांगितला तिचा मालकी हक्क

भारती हर्ष बाळाला घेऊन

भारतीने तिच्या बाळासाठी रूम निळ्या आणि पांढऱ्या रंगाने सजवली आहे. रूममध्ये खूप सारे फुगे लावण्यात आले असून त्यावर बेबी बॉय असं लिहिलं आहे. तसंच सॉफ्ट टॉइजनी भारतीने ही रूम भरून ठेवली आहे. व्हिडिओमध्ये भारती आणि हर्ष बाळासोबत कसे खेळत आहेत हेदेखील चाहत्यांना पाहता येणार आहे.

कॉमेडी सर्कसच्या सेटवर दहा वर्षापूर्वी भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांची पहिली भेट झाली. त्यानंतर ते एकमेकांना डेट करत होते. २०१७ ला या दोघांनी लग्न केलं. पाच वर्षानंतर जेव्हा भारतीला आई होण्याची चाहूल लागली तेव्हापासून अनेक गोड क्षण भारती आणि हर्ष यांनी त्यांच्या व्हॉगवरून शेअर केले आहेत. सध्या तरी दोघांचे तिघे झालो म्हणत गोलासोबत या दोघांची धमाल सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here