मुंबई: करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनचा कालावधी संपायला केवळ पाच दिवस उरले असले तरी संसर्ग फैलावतच आहे. अजूनही करोना रुग्णांचा आकडा वाढतच आहे. महाराष्ट्र त्यात आघाडीवर असून येथील करोनाग्रस्तांचा आकडा ११३५ वर पोहोचला आहे. जाणून घेऊया दिवसभरातील ताज्या घडामोडी…

लाइव्ह अपडेट्स:

>> पुण्यातील गुलटेकडीचा भाग सील केल्यानं पुणे एपीएमसीतील कामगारांमध्ये भीतीचं वातावरण

>> पुणे: मार्केटयार्डातील बाजार उद्यापासून बंद करण्याचा पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचा निर्णय… आडते आणि कामगारांचा काम करण्यास नकार

>> मुंबईतील वरळीत करोनाचं थैमान; आणखी ५५ रुग्ण सापडले!

>> महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांचा आकडा ११३५ वर; आतापर्यंत ११७ रुग्णांना डिस्चार्ज

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here