मुंबई : बॉलिवूडमध्ये आजपर्यंत इतक्या सेलिब्रिटी कलाकारांचे लग्नसोहळे झाले. कुणी शाही पॅलेसमध्ये सप्तपदी चालली तर कुणी परदेशातील डेस्टिनेशन वेडिंगचा थाट दाखवला. गेल्या वर्षी डिसेंबरच्या गुलाबी थंडीत बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांचं राजस्थानमध्ये शाही लग्न झालं. त्यांच्या लग्नाचाही खूप गाजावाजा झाला. पण त्याहीपेक्षा जास्त सध्या एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे बॉलिवूड स्टार कपल रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्या लग्नाची.

रणबीर- आलिया यांना नांदा सौख्य भरे म्हणण्यासाठी अवघी २८ वऱ्हाडी मंडळी येणार असून या यादीत नवरदेव रणबीरचे काका रणधीर कपूर तर नवरीचे काका मुकेश भट्ट यांनाच निमंत्रण पोहोचलेलं नाही. लग्नाचे विधी सुरू झाले तरी दोन्हीकडचे काका निमंत्रणाची वाट पहात आहेत. निमंत्रण न पोहोचण्यासाठी म्हणे कौटुंबिक रूसवेफुगवे निमित्त झाल्याचीही चर्चा आहे.

First Photo: आलिया-रणबीरच्या मेंदीमध्ये पाहुण्यांनी घेतली सिक्रेट एंट्री

आलिया रणबीर रणधीर कपूर

लग्नाच्या स्थळापासून ते बुफेमध्ये काय पदार्थ असणार इथपर्यंत ते नवरानवरी कोणत्या रंगाचा ड्रेस घालणार इथपासून ते लग्नाला कोण कोण येणार इथपर्यंतच्या चर्चांनी अख्खं बॉलिवूड रणबीर-आलिया यांच्या लग्नाच्या वर्णनात हरवून गेलं आहे. त्यात राहुल भट्टने लग्नाची तारीख पुढे ढकलल्याचं म्हटलं असलं तरी आर. के. हाउसवर लगीनघाई दिसायला लागली आहे. मुळात आधी २८ पाहुण्यांनाच लग्नाला बोलवलं आहे ज्यामध्ये आलियाकडून आई सोनी राजदान व वडील महेश भट्ट सोडल्यास फक्त तिच्या आजोळचे नातेवाईक येणार आहेत अशी खबर आहे. तर कपूरांचा गोतावळा मोठा असल्याने निमंत्रितांच्या यादीत रणबीरकडून येणाऱ्या पाहुण्यांचीच यादी मोठी आहे.

आलिया भट्ट कुटुंबासोबत

रणधीर कपूर यांना निमंत्रण का दिलं नाही याचं कारण रणबीरची आई नीतू सिंग यांना माहीत आहे पण त्यांनी मौन बाळगलं आहे. तर मुकेश भट्ट यांना निमंत्रण न देण्यामागे कौटुंबिक कारण असल्याचं बोललं जातंय. भट्ट प्रॉडक्शनचे दोन भाग करण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या मुकेश यांच्यावर महेश भट्ट नाराज आहेत. तर सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी मुकेश भट्टने चुकीचे विधान केले म्हणूनही महेश भट्ट आणि मुकेश भट्ट यांच्यात वाद झाला होता. त्यामुळेच कदाचित महेश भट्ट यांच्या यादीत मुकेश यांचे नाव नसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भारती सिंगने मुलाचं नाव काय ठेवलं ते पाहाच… तुम्हालाही येईल हसू

लग्नस्थळी पाहुणे यायला सुरूवात झाली आहे. सुरक्षेची काळजी घेतली जात आहे. पाहुण्यांच्या मोबाइल कॅमेऱ्यावर स्टीकर लावले जात आहेत. पण निमंत्रितांमध्ये मुकेश भट्ट आणि रणधीर कपूर या दोन व्यक्ती दिसतील की नाही याची शंकाच आहे. त्यामुळे आता रूसवेफुगवे विसरून रणधीर कपूर आणि मुकेश भट्ट यांना बोलवलं जाईल की नाही हे लग्नादिवशीच कळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here