मुंबई : गेल्या वर्षी ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं. त्यांच्या जाण्यामुळे त्यांची पत्नी आणि अभिनेत्री सायरा बानू पूर्णपणे खचून गेल्या आहेत. आता त्या एकाकी राहू लागल्या आहेत. त्यांच्या जवळच्या अनेक सुहृदांनी सायरा बानू यांना समजावण्याचा प्रयत्न केला परंतु त्या कुणाच्याही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीत. अलिकडेच सायरा बानू यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या मनस्थितीबद्दल काही धक्कादायक गोष्टी सांगितल्या आहेत. त्या ऐकून त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये सायरा बानू यांना विचारलं की दिलीप साहेबांच्या जाण्यामुळे तुम्ही तुमच्याच विश्वात हरवून गेला आहात का ? त्यावर सायरा बानू यांनी सांगितलं की, ‘ मी खूपच त्रासले आहे. खूप दुःखात आहे. या दुःखातून अजूनही बाहेर पडू शकलेली नाही. मी यातून कशी बाहेर पडू हेच कळत नाही. मला यातून बाहेर पडता येत नाही.’ सायरा बानू यांनी पुढे सांगितलं की, ‘मी आता सगळं काही आनंदानं करत होते. सर्व काही सुरळीत सुरू होते. आम्ही दोघं एकत्र होतो. मला साहेबांबरोबर घरी राहणं आवडत होतं. मी काही बाहेर पार्ट्यांमध्ये रमणारी व्यक्ती नाही. पण आता मला घराच्या बाहेर पडायलाही नको वाटतं.’

Ranbir Alia wedding guest list : रणधीर कपूर आणि मुकेश भट्ट यांना निमंत्रणच नाही

दिलीप कुमार सायरा बानू

सायरा बानू सर्वांपासून राहतात दूर

जेव्हा सायरा बानू यांना विचारलं की, त्या अशा कधीपर्यंत राहणार. त्यावर त्यांनी माहिती नाही असं उत्तर दिलं. त्या पुढे म्हणाल्या की, ‘मला माहिती नाही मी यातून कधी बाहेर येईन ते. कारण माझ्या मते यातून बाहेर येण्यातही काहीच अर्थ नाही.’ गर्दीत राहूनही सायरा बानू एकाकी झाल्या आहेत. त्याबद्दल त्यांनी सांगितलं की, ‘मी हरले आहे असं नाही. पण आयुष्याच्या या टप्प्यावर मला साहेबांची नितांत गरज भासते आहे. अगदीच स्पष्टपणे सांगायचं तर मला आता लोकांशी मिळून मिसळून वागायला-बोलायला आवडत नाही. आता मला फक्त माझ्या अगदी जवळच्या मित्रांबरोबर रहायला आवडतं. मी सुदैवी आहे, माझी काळजी घेणारे अनेक जण माझ्याभोवती आहेत. सध्या मी मेडिटेशन आणि प्रार्थना करण्यावर जास्त भर देत आहे.’

सायरा बानू दिलीप कुमार

वयाच्या २७ व्या वर्षी मराठमोळ्या अभिनेत्रीच्या पतीचं झालेलं निधन

सायराजींनी यावेळी सांगितलं की, त्यांना एकटं राहून मन:शांती मिळते. दिलीप साहेबांशी त्यांचं नातं अतिशय जिव्हाळ्याचं होतं. ते दोघं एकमेकांच्या खूप जवळ होते. त्यामुळेच त्यांच्या जाण्याच्या दुःखातून बाहेर यायला त्यांना जास्त वेळ लागत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here