मुंबई : बॉलिवूडची अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाचा फिव्हर बॉलिवूडमध्ये सर्वांना चढला आहे. या दोघांचे चाहते नवदांपत्याशी संबंधित बातमी, फोटो पाहण्यासाठी खूपच आतुर आहेत. रणबीरच्या ‘वास्तू’ या घरी लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. बुधवारी म्हणजे १३ एप्रिल रोजी सकाळी गणेश पूजन झाले. त्यानंतर आता मेंदी समारंभाला प्रारंभ झाला आहे. या लग्नसोहळ्याला सध्या तरी २८ जण वऱ्हाडी म्हणून उपस्थित राहणार असल्याचं समजते. हे सर्व जण दोघांच्याही खूप जवळचे आहेत. आलिया आणि रणबीर यांनी त्यांच्या अगदी जवळच्याच मित्रमंडळींना लग्नाचं निमंत्रण दिलं आहे. सर्वजण अतिशय आनंदात आहेत. असं असलं तरी सर्वांना ऋषी कपूर यांची तीव्रतेनं आठवण येत आहे.

Ranbir Alia wedding guest list : रणधीर कपूर आणि मुकेश भट्ट यांना निमंत्रणच नाही

ऋषी कपूर यांची ही इच्छा राहिली अपूर्ण

काही वर्षांपूर्वी ऋषी कपूर यांनी त्यांचा लेक रणबीर याच्या लग्नाबाबत एक इच्छा जाहीर केली होती. त्यांनी सांगितलं होतं की, त्यांना रणबीरचं लग्न बघायचं आहे. ऋषी यांनी त्यांच्या ‘खुल्लम खुल्ला’ या आत्मचरित्रामध्ये याचा उल्लेख केला आहे. या आत्मचरित्राचं लेखन मीना अय्यर यांनी केलं आहे. ऋषी कपूर यांनी सांगितलं होतं की, त्यांना रणबीरचं लग्न बघायची इच्छा आहे. त्याचं लग्न त्याच्या इच्छेनुसार व्हावं असंही त्यांनी सांगितलं होतं.

ऋषी कपूर कुटुंबाबरोबर

मीना अय्यर यांनी सांगितलं की, ऋषी यांनी त्यांना सांगितलं होतं की, रणबीरला जर इंटिमेट वेडिंग करायचं असेल तर त्यासाठी त्याला पूर्ण मोकळीक आहे. ऋषी कपूर यांनी सांगितलं होतं की,’लग्नाबाबतचा संपूर्ण निर्णय रणबीरचाच असणार आहे. तो मला मान्य असेल. जर त्याच्या लग्नात अवघे ४५ लोक सहभागी व्हावं असं जरी त्यानं सांगितलं तरी ते मला मान्यच असेल. मी माझ्या मित्रमंडळींची क्षमा मागेन आणि त्यांना विनंती करीन की त्यांनी तिथून त्याला आशीर्वाद द्यावेत. रणबीर हा खूप खासगीपण जपणारा व्यक्ती आहे. त्याच्या या स्वभावाचा मला आदर आहे.’ ऋषी कपूर यांचं ३० एप्रिल २०२० मध्ये निधन झालं.

First Photo: आलिया-रणबीरच्या मेंदीमध्ये पाहुण्यांनी घेतली सिक्रेट एंट्री

दरम्यान, आलिया आणि रणबीर यांच्या लग्नाच्या आधीच्या विधींना प्रारंभ झाला आहे. मेंदी समारंभात कपूर आणि भट्ट कुटुंबातील सदस्य सहभागी झाले आहेत. हे सर्व विधी ‘वास्तू’ अपार्टमेंटमध्ये होणार आहेत. रणबीर कपूरचं घर अतिशय सुंदर पद्धतीनं सजवण्यात आलं आहे. आलियाचा देखील याच बिल्डिंगमध्ये फ्लॅट आहे. या दोघांचं १७ एप्रिल रोजी लग्न होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here