रमेश दुबे
रमेश दुबे आणि आलिया भट्ट यांचं शाळेत असताना एकमेकांच्या प्रेमात होतं. तसं बघायला गेलं तर आलियाचा हा पहिला बॉयफ्रेंड. हे दोघंजण जमनाबाई नर्सरी स्कूलमध्ये एकत्र शिकले. रमेश हा अतिशय खासगीपण जपणारा आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल फारशी माहिती सोशल मीडियावर उपलब्ध नाही.
एवढा खर्च! आलिया- रणबीरसाठी आला सोन्याच्या फुलांचा बुके!
सिद्धार्थ मल्होत्रा

आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी करण जोहरच्या ‘स्टुटंड ऑफ द इयर’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमातही पडले. या दोघांनी ‘कपूर अँड सन्स’ या सिनेमात पुन्हा एकत्र काम केलं. परंतु कालांतरानं हे दोघं जणं वेगळे झाले. एकमेकांपासून वेगळं झाल्यानंतर त्यांनी ब्रेकअपबद्दल जाहीरपणे कधीच भाष्य केलं नाही.
अली दादरकर

बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यापूर्वी आलिया भट्ट अली दादरकर याच्यासोबत डेट करत होती. हे दोघंही जण लहानपणापासूनचे मित्र होते. या दोघांनी काही काळ एकत्र देखील घालवला होता. हे दोघंजण अनेकदा डिनर डेटला एकत्र दिसले होते. तसंच फिरायला देखील ते एकत्रच जायचे. परंतु आलियानं जेव्हा बॉलिवूडमध्ये प्रवेश केला तेव्हापासून तिचं वागणं बदललं, असं अलीनं सांगितलं. त्यानंतर आलिया आणि सिद्धांत एकमेकांना डेट करू लागल्यानं अलीनं तिच्यापासून फारकत घेत त्याचं वेगळं आयुष्य जगायला सुरुवात केली.
Ranbir-Alia Wedding : बाबा ऋषी कपूर यांची शेवटची इच्छा पूर्ण करतोय रणबीर कपूर, आलियानेही दिली संमती

सिद्धार्थ मल्होत्राबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर आणि रणबीर आलिया एकमेकांना डेट करण्याआधी ती केविन मित्तलच्या खूप जवळ होती. असं म्हणतात की हे दोघंजण एकमेकांना डेटही करत होते. केविन हा हाईक या मेसेंजर अॅपचा फाऊंडर मेंबर तर आहेच शिवाय उद्योगपती मित्तल घराण्याशी संबंधितही आहे. त्याचे वडील सुनील मित्तल आहेत आणि त्यांची स्वतःची एअरटेल ही टेलीकॉम कंपनी आहे. आलिया आणि केविनची भेट एका इकोनॉमिक समिटमध्ये झाली होती.