नाशिक : मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष अनंता सूर्यवंशी यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. आज सकाळी अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला. ते ४८ वर्षांचे होते. त्यांच्या अशा अकाली जाण्याने संपूर्ण राजकीय क्षेत्रात आणि मनसेमध्ये शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, ते सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. तिथून परतल्यानंतर त्यांनी स्विमिंग केलं आणि पूलमधून बाहेर येताच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. ही बाब इतरांच्या लक्षात येताच सूर्यवंशी यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. सूर्यवंशी यांच्या जाण्यामुळे मनसेतला एक सच्चा नेता हरवला अशी प्रतिक्रिया येत आहे.

शिवसैनिकांनी पुन्हा राज ठाकरेंना डिवचलं; जुना फोटो लावत शिवसेना भवनासमोर पोस्टरबाजी
खरंतर, अनंता सूर्यवंशी यांच्याबद्दल अधिक सागायचं झालं तर ते मनसेच्या स्थापनेपासूनच पक्षात सदैव कार्यरत होते. ते राज ठाकरे यांचे अतिशय जवळचे नेते होते. सूर्यवंशी यांनी पंचवटी परिसरातून नगरसेवक पददेखील भूषवलं होतं. ग्रामीण भागात तब्बल ५ वर्ष ते मनसेचे जिल्हाध्यक्ष होते.

कमी बोलणारे पण सतत पक्षासाठी काम करणारे निष्ठावान नेते अशी त्यांची ओळख होती. त्यामुळे सूर्यवंशी यांच्या अशा जाण्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

कामावर हजर राहायचं की नाही? गुणरत्न सदावर्तेंच्या अटकेनंतर एसटी कर्मचारी संभ्रमात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here