सोलापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज अनेक कार्यंक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. अशात सोलापुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टुडंट युनियनच्यावतीने एक अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. इंधन दरवाढीने त्रस्त असलेल्या नागरिकांना एक रुपयात एक लिटर पेट्रोल वाटप करण्यात येत आहे.
सध्याची दाहक इंधन दरवाढ लक्षात घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक रुपयात एक लिटर देण्याचा उपक्रम हाती घेतला. यामुळे पेट्रोल पंपावरील तोबा गर्दी आटोक्यात आणण्यासाठी चक्क पोलिसांना मध्यस्थी करावी लागली आहे.