कपूर खानदानाची सुरुवात पृथ्वीराज कपूरपासून झाली. कपूर कुटुंबाची मूळं पाकिस्तानात आहेत. फाळणीनंतर हे कुटुंब भारतात आलं. पृथ्वीराज यांचा जन्म पाकिस्तानातल्या फैसलाबाद इथला. त्यांनी आपल्या करियरची सुरुवात मूक चित्रपटापासून केली. पृथ्वीराज कपूर यांनी १९४४ मध्ये मुंबईत पृथ्वी थिएटरची स्थापना केली. तिथे देशभरच्या नाटकांचे प्रयोग होत असतात.
Ranbir Alia Wedding LIVE: हळदीचा कार्यक्रम संपला, थेट मंडपात जाणार रणबीर कपूर
पृथ्वीराज कपूर यांना ५ मुलगे आणि एक मुलगी

पृथ्वीराज कपूर यांना ६ मुलं झाली. त्यात राज कपूर, शम्मी कपूर, शशी कपूर, रविंदर कपूर, देविंदर कपूर आणि मुलगी उर्मिला कपूर. पण पृथ्वीराज यांचा अभिनयाचा वारसा तीन मुलांनीच पुढे चालवला.
राज कपूर

भारतीय सिनेमाचे शोमॅन म्हणून राज कपूर ओळखले जातात. त्यांनी मैलाचे दगड ठरतील असे सिनेमे तयार केले. त्यांची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं. राज कपूर यांनी कृष्णा मल्होत्राबरोबर लग्न केलं. कृष्णा अभिनेते प्रेम नाथ, राजेंद्र नाथ आणि नरेंद्र नाथ यांची बहीण होत्या. कृष्णा यांची दुसरी बहीण उमा यांचं लग्न प्रेम चोप्रा यांच्याबरोबर झालं.
राज कपूर आणि कृष्णाची ५ मुलं
राज कपूर आणि कृष्णा कपूर यांना ५ मुलं होती. रणधीर कपूर, ऋषी कपूर, राजीव कपूर, रीमा कपूर आणि रितू नंदा.
रणधीर कपूर
रणधीर कपूर हे ७०च्या दशकात लोकप्रिय अभिनेते होते. त्यांनी अभिनेत्री बबिताशी लग्न केलं. त्यांना करिना आणि करिष्मा या दोन मुली आहेत. ज्यांनी बाॅलिवूडमध्ये खूप नाव कमावलं आहे.
Ranbir- Alia Wedding: मेंदीनंतर नीतू कपूर यांनी शेअर केलेला Video तुम्ही पाहिलात का?
ऋषी कपूर
ऋषी कपूर बाॅलिवूडमधला लोकप्रिय चेहरा. २०२०च्या एप्रिलमध्ये कॅन्सरमुळे त्यांचं निधन झालं. ऋषी कपूरनं १९८० मध्ये नीतू कपूरशी लग्न केलं आणि त्यांना रणबीर, रिद्धिमा ही दोन मुलं झाली.
शम्मी कपूर
पृथ्वीराज कपूर यांचा मुलगा शम्मी कपूर. ते शमशेर राज कपूर नावानं ओळखले जायचे. डान्समध्ये माहीर असलेल्या शम्मी यांनी एकापेक्षा एक हिट सिनेमे दिले. शम्मी कपूर यांची दोन लग्न झाली. पहिलं गीता बालीसोबत, तर दुसरं नीला देवीबरोबर. त्यांना दोन मुलं झाली. आदित्य राज कपूर आणि कंचन केतन देसाई.
शशी कपूर
पृथ्वीराज कपूरचा मुलगा शशी कपूर त्या काळात चाॅकलेट हिरो म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या रोमँटिक अंदाजाचे सगळेच दिवाने होते. त्यांनी जेनिफर केंडलसोबत लग्न केलं. करण कपूर, कुणाल कपूर आणि संजना कपूर ही त्यांची मुलं.
याशिवाय रविंदर कपूर, देविंदर कपूर आणि मुलगी उर्मिला कपूर ही मुलं नेहमीच बाॅलिवूडच्या झगमगाटापासून दूरच राहिली.
महेश भट्ट यांची आई होती मुस्लीम

आलियाचे वडील महेश भट्ट बाॅलिवूडमधले प्रसिद्ध फिल्म मेकर. महेश भट्टचे वडील नानाभाई भट्ट पोरबंदर, काठियावाड गुजरात इथले ब्राह्मण होते. सिनेमाची आवड महेश भट्टना वडिलांपासून मिळाली. नानाभाईंचं लग्न दुसऱ्या एका स्त्रीशी झालं होतं. पण शिरीन मोहम्मद अली या महिलेसोबत त्यांचं रिलेशन होतं. या प्रेमसंबंधांतून महेश भट्ट यांची जन्म झाला. शिरीन आणि नानाभाईंचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. पण त्यांनी कधी लग्न केलं नाही.
आलियाची आजी होती जर्मन आणि आजोबा होते काश्मिरी पंडित
आलियाचा आई सोनी राजदानची आई जर्मन आहे. तिचं नाव आहे Gertrude Hoelzer . सोनी राजदानचे वडील नरेन्द्र नाथ राजदान कश्मिरी पंडित होते.