मुंबई : अखेर तो दिवस आला. ज्या दिवसाची प्रतीक्षा कपूर घराणे, भट कुटुंब आणि बॉलिवूड स्टार कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे करोडो चाहते करत होते. पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर आलिया आणि रणबीर यांचे लग्न १४ एप्रिलच्या दुपारी दोनच्या मुहूर्तावर होणार आहे. रणबीरच्या पाली हिल येथील वास्तू या घरातच ही जोडी सप्तपदी चालणार आहे. १३ एप्रिलला आलियाच्या हातावर मेंदी लागली तेव्हापासूनच भावुक झालेल्या रणबीरच्या आई अभिनेत्री नीतू कपूर यांचे डोळे अनेक आठवणींमुळे पाणावत आहेत.

एकीकडे आनंदाचं वातावरण आणि दुसरीकडे रणबीरचे वडील ऋषी कपूर यांची उणीव यामुळे हा सोहळा खूपच भावनिक होत आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट या जोडीच्या लग्नाची चर्चा तशी गेल्या काही वर्षापासून सुरू आहेच. पण काही दिवसांपूर्वी आलियाच्या आजोबांची तब्येत बिघडल्याने त्यांच्या इच्छेखातर या जोडीने लवकरात लवकर बोहल्यावर चढण्याचं ठरवलं.

Ranbir- Alia Wedding : एक्स बॉयफ्रेंडच्या रिसेप्शनला दीपिका पादुकोण राहणार उपस्थित!

नीतू कपूर आलिया रणबीर

त्यानंतर रणबीर आणि आलियाची लगीनघाई सुरू झाली. सुरूवातीला लग्नाचं स्थळ आर. के. हाउस निश्चित करण्यात आलं, ज्याठिकाणी रणबीरच्या आजी कृष्णा कपूर यांच्या आठवणी आहेत. इतकंच नव्हे तर नीतू सिंग आणि ऋषी कपूर यांचं लग्नही ४२ वर्षापूर्वी कृष्णराज याच बंगल्यात झालं होतं. पण सुरक्षेच्या कारणास्तव हे ठिकाण बदलण्यात आलं आणि आता कपूरांच्या घराची सून बनून आलिया रणबीरच्या वास्तू या घरातच माप ओलांडणार आहे.

रणबीर आलिया

रणबीर कपूरचे पूर्वज होते पाकिस्तानात, आलिया भट्टची आजी होती मुस्लीम

खरं तर हे लग्न १७ एप्रिलला होणार होतं पण १३ तारखेला आलियाच्या मेंदी सोहळ्यानंतर नीतू कपूर आणि रणबीरची बहीण रिध्दिमा यांनी लग्न १४ एप्रिलला वास्तूमध्येच होणार असल्याचं सांगितलं. यावेळी आलिया इज बेस्ट अशी खास कॉम्प्लिमेंटही नीतू यांनी होणाऱ्या सुनेला दिली. तर नणंद रिध्दिमाने आलियाला क्यूट म्हणत तिचं कौतुक केलं. आलियाने मेंदीमध्ये रणबीरचा आठ हा लकीनंबर रेखाटला आहे. आर. के. हाउसपासून वास्तू अपार्टमेंटपर्यंत रणबीरची वरात निघणार असून त्यानंतर दुपारी सप्तपदी होईल.

लग्नासाठी भट्ट आणि कपूर कुटुंबातील महत्त्वाच्या व्यक्तींशिवाय रणबीर आणि आलियाचा मोजकाच मित्रपरिवार असे ५० लोकच सहभागी होणार आहेत. पण रिसेप्शनसाठी अख्खं बॉलिवूड निमंत्रित असेल जे वास्तू याच घरात होणार असंही सांगण्यात आलं आहे. रणबीर आणि आलियाच्या लग्नासाठी वास्तू हे रणबीरचं घर पाहुण्यांनी भरून गेलं असताना एक पोकळी आहे ती ऋषी कपूर यांची. मुलाचं लग्न पाहण्याची त्यांची इच्छा अपुरी राहिल्याने नीतू सिंग यांना त्यांची आठवण येत आहे. मेंदी सोहळ्यानंतर त्या स्वत:ला रोखू शकल्या नाहीत आणि त्यांच्या डोळ्यातून पाणी आलंच.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here