मुंबई : बॉलिवूडची सध्या सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी म्हणजे आलिया भट्ट आणि रणबीर कपूर. या दोघांचं १४ एप्रिल रोजी लग्न होत आहे. दोघांच्याही घरी लग्नापूर्वीचे विधी समारंभ होत आहेत. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर टप्प्याटप्प्यानं व्हायरल होत आहेत. मात्र, दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी या दोघांच्या लग्नाबद्दल अधिकृतरित्या काहीही भाष्य केलेलं नाही. परंतु या दोघांचं लग्न आजच असल्याचं सांगितलं जात आहे.

आलिया रणबीर

लग्नसोहळ्याला आणि त्यानंतर होणाऱ्या रिसेप्शनच्या पार्टीला कुणाला आमंत्रित करण्यात आलं आहे, याची चर्चाही सोशल मीडियावर सुरू आहे. रणबीरनं त्याच्या रिसेप्शन सोहळ्याला त्याची एक्स गर्लफ्रेंड दीपिका पादुकोण आणि तिच्या नवरा रणवीर सिंह याला आमंत्रित केलं आहे. या पार्श्वभूमीवर केआरकेनं एक ट्विट करत आलियाचा एक्स बॉयफ्रेंड सिद्धार्थ मल्होत्रा याची खुलेआम टिंगल केली आहे.

रणबीरएवढीच आलियाचीही आहे ‘एक्स’ची यादी, बघा तुम्ही किती जणांना ओळखता!

केआरकेचं ट्विट

कमाल आर खाननं त्याच्या ट्विटर हँडलवरून आलियाचा एक्स बॉयफ्रेंड असलेल्या सिद्धार्थची मस्करी केली आहे. आलियानं तिच्या लग्नामध्ये सिद्धार्थला न बोलावल्याबद्दल त्याला ट्रोल केलं आहे. केआरकेने पूर्वी एका ट्विटमध्ये आलिया आणि सिद्धार्थवर टीका केली होती. त्यावरून सिद्धार्थनं केआरकेबरोबर भांडणही केलं होतं. परंतु आता त्याच गर्लफ्रेंडनं तिच्या लग्नाला सिद्धार्थला बोलावलेलं नाही, त्यावरून त्याची मस्करी केली आहे. केआरकेनं त्याच्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, ‘एकदा सिद्धार्थ मल्होत्रानं आलिया भट्टवरून माझ्याशी भांडण केलं होते. आता आलियानं तिच्या लग्नात त्याला बोलावलेलं नाही. आता तुझी लायकी समजली ना…धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का…’ असं त्यानं लिहिलं आहे.

केआरकेनं केलेल्या या ट्विटनंतर युझर्सनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. काहींनी कॉमेन्ट करत त्याची शाळाही घेतली आहे. एका युझरनं लिहिलं आहे की, ‘आधी जा आणि त्याचं स्पेलिंग कसं लिहायचं ते शिकून ये आणि मग बोल… त्यावेळी त्यानं त्याच्या गर्लफ्रेंडची बाजू घेतली होती. त्याचं वागणं योग्यच होतं.’ तर आणखी एका युझरनं लिहिलं आहे की, ‘तुझी लायकी सर्व जगाला कळली आहे. आधी स्वतःमध्ये सुधारणा कर…’

Ranbir- Alia Wedding : एक्स बॉयफ्रेंडच्या रिसेप्शनला दीपिका पादुकोण राहणार उपस्थित!

सिद्धार्थ आणि आलिया २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या स्टुडंट ऑफ द इयर या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर हे दोघं जण एकमेकांना डेट करू लागले. परंतु त्यांचं हे नात फार काळ टिकलं नाही आणि ते वेगळे झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here