नव्यानं नोंद झालेल्या रुग्णांमध्ये मुंबईतील सर्वाधिक १४३ रुग्ण आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या क्षेत्रात ४, पुणे, औरंगाबादमध्ये प्रत्येकी ३, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबईमध्ये प्रत्येकी दोन रुग्ण आढळून आले आहेत. तर, यवतमाळ, ठाणे, मीरा-भाईंदर, वसई-विरार आणि सिंधुदुर्गात प्रत्येकी एकाला करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.
देशात करोनाची साथ आल्यापासून हे करोनाच्या संसर्गाचं जणू केंद्रच बनलं आहे. येथील संसर्ग थांबता थांबत नाही. शहरातील अनेक परिसर सील केल्यानंतरही संसर्ग थांबताना दिसत नाहीए. वरळी आणि धारावी हे दोन विभाग मुंबईतील सर्वाधिक बाधित आहेत. तेथील रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत आहे. संसर्ग रोखण्यासाठी व बाधितांचा आकडा कमी करण्यासाठी प्रशासन शक्य ती सर्व पावलं उचलत आहे. खबरदारी म्हणून महापालिकेनं निर्बंध आणखी कठोर केले असून घराबाहेर पडताना मास्क घालणं सक्तीचं केलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times