जयपूर : आयएएस अधिकारी टीना डाबी (Tina Dabi) आणि प्रदीप गावंडे (Pradeep Gawande) लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. २२ एप्रिलला राजस्थानातील जयपूरमध्ये त्यांचं लग्न होणार आहे. दोघेही राजस्थान केडरचे आयएएस अधिकारी आहेत. दुसरीकडे टीना डाबी आणि प्रदीप गावंडे यांच्या लग्नापूर्वीच राजस्थान सरकारकडून आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदली झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये प्रदीप गावंडे यांच्या नावाचा देखील समावेश आहे.
IAS टीना डाबी होणार महाराष्ट्राची सून; ४१ वर्षीय मराठी अधिकाऱ्यासोबत विवाहबंधनात अडकणार!
प्रदीप गावंडे यांची बदली आता मंत्रालयात करण्यात आली आहे. यापूर्वी ते पुरातत्त्व आणि संग्रहालय विभागात कार्यरत होते. आता त्यांची नियुक्ती उच्च शिक्षण विभागात संयुक्त सरकारी सचिव म्हणून करण्यात आली आहे.

टीना डाबी सध्या राजस्थानच्या वित्त विभागात संयुक्त सचिव म्हणून कार्यरत आहेत. आता प्रदीप गावंडे देखील मंत्रालयात आले आहेत. दुसरीकडे टीना डाबी आणि प्रदीप गावंडे यांनी सोशल मीडियापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं टीना डाबी आणि प्रदीप गावंडे यांचे फॅन्स निराश झाले आहेत. टीना डाबी यांनी त्यांचं इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाऊंट डीअॅक्टिव्हेट केलं होतं. प्रदीप गावंडे यांनी देखील त्यांचं इंस्टाग्राम अकाऊंट बंद करुन सोशल मीडियाला पासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता.
मनसेला भाजपसोबत घेणार का? चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितलं…

प्रदीप गावंडे हे २०१३ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होण्यापूर्वी त्यांनी एमएमबीएसचं शिक्षण पूर्ण केलं होतं. गावंडे चुरु जिल्ह्याचे जिल्हाधिकारी देखील राहिले आहेत. २२ एप्रिलला जयपूरमध्ये प्रदीप गावंडे आणि टीना डाबी लग्न करणार आहेत. टीना डाबी यांचं हे दुसरं लग्न असेल. तर प्रदीप हे पहिल्यांदा लग्न करत आहेत. प्रदीप हे टीना डाबी यांच्या पेक्षा १३ वर्षांनी मोठे आहेत. जयपूरमध्ये लग्न केल्यानंतर पुण्यात स्वागत समारंभ होणार असल्याची माहिती आहे.

टीना डाबी या २०१६ मध्ये आयएएस परीक्षेत देशात पहिल्या आल्या होत्या. त्यानंतर त्यांना राजस्थान केडर मिळालं होतं. २०१८ मध्ये त्यांनी आयएएस अधिकारी अतहर खान यांच्यासोबत आंतरधर्मीय लग्न केलं होतं. मात्र, दोन वर्षात त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता.
गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणी वाढल्या; आर्थर रोड तुरुंगातून सातारा पोलिसांनी घेतलं ताब्यात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here