
लग्नाची तयारी करण्यासाठी शेकडो माणसं असली तरी एका गोष्टीसाठी मात्र खुद्द नवरोबा रणबीर कपूर यालाच जावं लागलं. सेलिब्रिटी स्टार, कपूर घराण्याचा वारसदार असूनही रणबीरला लग्नासाठी एका खास गोष्टीची परवानगी घ्यावी लागली आणि ती परवानगी होती वास्तू या बिल्डिंगमधील फ्लॅटमध्ये इव्हेंट करण्याची. इतकंच नव्हे तर लग्नसोहळा झाल्यानंतर सोसायटी नियमानुसार बिल्डिंगच्या आवाराची स्वच्छता करून देण्याची अट मान्य केल्यानंतरच रणबीरला लग्नाची तयारी करण्याची परवानगी मिळाली.
रणबीर आणि आलिया यांच्या लग्नाच्या डेस्टिनेशनवर खूप चर्चा झाली. सुरूवातीला हे लग्न आर. के. हाउस म्हणजेच कृष्णराज बंगल्यात होणार होतं, पण सुरक्षेचे कारण देत लग्नाचं ठिकाण बदलून ते रणबीर सध्या राहत असलेल्या वास्तू या अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्येच करायचं ठरलं. या अपार्टमेंटच्या सोसायटी नियमानुसार बिल्डिंगमधील फ्लॅटमध्ये कोणताही कार्यक्रम करायचा असेल तर त्याची परवानगी सोसायटी मंडळाकडून घ्यावी लागते. रणबीर कपूरलाही हा नियम लागू असल्याने लग्नस्थळ वास्तूमध्ये होणार म्हटल्यावर रणबीरने परवागनीचे सारे सोपस्कार केले. तसंच लग्नसोहळा झाल्यानंतर संपूर्ण बिल्डिंगच्या आवाराची स्वच्छता करून देण्याची अटही रणबीरला मान्य करावी लागली.
Ranbir Alia Wedding LIVE: रणबीर- आलियाचं झालं लग्न, ३.३० वाजता साताजन्माची
लग्नसोहळ्यासाठी वास्तूची सजावट करण्यात आली असून सोसायटीच्या वॉचमनलाही रणबीरकडून नवीन युनिफॉर्म आहेर म्हणून देण्यात आला आहे. लग्नसोहळ्यासाठी बांद्र्यातील वास्तू या बिल्डिंगचा आवार पांढऱ्या रंगाच्या पडद्यांनी झाकून घेतला आहे. ज्यामुळे बाहेरून कुणीही आत काय चाललंय हे पाहू शकणार नाही. काही सजावटीसाठी आवारात खांब लावले आहेत. रोषणाई करण्यात आली आहे. लग्नघर म्हणून वास्तू अपार्टमेंट सजली असली तरी यासाठी रणबीरला सोसायटीच्या नियमांचं पालन करावं लागलं आहे.