रणबीर कपूरचे आजे सासरे
आलिया भट्टचे आजोबा नानाभाई भट्ट यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. महेश भट्ट यांचे वडील नानाभाई हे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते होते. भट्ट कुटुंबानं गुजराती आणि हिंदी सिनेविश्वामध्ये खूप लोकप्रियता मिळवली होती. १९५७ प्रदर्शित झालेल्या ‘मिस्टर एक्स’ आणि १९५९ मध्ये प्रदर्शित झालेला ‘कंगन’ हा सिनेमा लोकप्रिय झाला होता. नानाभाई यांचं पहिलं लग्न हेमलता यांच्याशी झालं. तर नानाभाईंचं नातं शिरीन मोहम्मद यांच्याशी जुळलं होतं. परंतु नानाभाईंच्या या नात्यामुळे दोन्ही कुटुंबामध्ये तणाव निर्माण झाला होता. नानाभाई-हेमलता यांना दोन मुलं होती.
लग्नासाठी सारं काही! रणबीरने लग्नानंतर बिल्डिंग स्वच्छ करून देण्याचं दिलं वचन
रॉबिन भट्ट रणबीरचे चुलत सासरे

नानाभाई यांना एकूण नऊ मुलं होती. हेमलतापासून त्यांना रॉबिन आणि कीर्ति भट्ट ही दोन मुलं होती. रॉबिन भट्ट यांनी सडक, जुनून, आशिकी यांसारख्या सिनेमासाठी लेखन केलं होतं.
रणबीर कपूरचे सासरे महेश भट्ट

आलिया भट्ट हिचे वडील महेश भट्ट यांना ओळखत नाही असं कुणीही नाही. महेश भट्ट यांचा भाऊ मुकेश भट्ट, हेमा सुरी, शैला भट्ट हे देखील लोकप्रिय आहेत. महेश भट्ट यांनी त्यांच्या कुटुंबात सर्वाधिक लोकप्रियता मिळवली. ही लोकप्रियता त्यांनी अत्यंत कमी कालावधीत मिळवली. आशिकी, सडक, अर्थ, सारांश, साथी, जुनून, गुनाह, सर, हम है राही प्यार के, चाहत, दस्तक,मिलन, दुश्मन, संघर्ष, राज, जिस्म, मर्डर यांसारखे अनेक सिनेमे बनवले.
Ranbir- Alia Wedding : एक्स बॉयफ्रेंडच्या रिसेप्शनला दीपिका पादुकोण राहणार उपस्थित!
रणबीरला आहेत दोन सासवा

आलिया भट्ट हिच्या वडिलांनी महेश भट्ट यांनी देखील दोन लग्न केली. १९६८ मध्ये ब्रिटिश लेडी लॉरेनब्राइट (किरण) यांच्याशी त्यांनी लग्न केलं. त्यांच्यापासून महेश यांना पूजा भट्ट आणि राहुल भट्ट ही मुलं झाली. महेश भट्ट यांचं नाव बॉलिवूडची अभिनेत्री परवीन बाबी हिच्याशी जोडण्यात आलं होतं. हे दोघं काही दिवस लिव्ह इन रिलेशनमध्येही रहात होते. परंतु परवीन बाबी आजारी पडली. त्यानंतर महेश आणि तिच्या नात्यात दुरावा आला. सारांश सिनेमाच्या सेटवर महेश भट्ट यांची भेट सोनी राजदानशी झाली. सोनी राजदान ही ब्रिटिश अभिनेत्री आहे. सोनी आणि महेश यांच्यात प्रेम निर्माण झालं आणि त्यांनी लग्नाचा निर्णयही घेतला.
महेश भट्ट यांना चार मुलं

महेश भट्ट यांना पहिल्या लग्नापासून पूजा आणि राहुल अशी दोन मुलं आहेत. पूजा ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. तर राहुल फिटनेस ट्रेनर आहे. तर सोनी राजदान आणि महेश भट्ट यांना आलिया व शाहीन या दोन मुली आहेत.
रणबीरच्या आधी ही व्यक्ती भट्ट कुटुंबाचा जावई

महेश भट्ट यांची मोठी मुलगी पूजा ही अनेकांबरोबर रिलेशनमध्ये होती. तिचं नाव रणवीर शौरे, बॉबी देओल, फरदीन खानपर्यंत जोडलं गेलं होतं. परंतु तिनं मनीष मखीजाबरोबर लग्न केलं. परंतु त्यांचं लग्न ११ वर्षांनंतर तुटलं.
इमरान हाश्मीचं भट्ट कुटुंबाबरोबर आहे नातं

रणबीर कपूरच्या सासरच्या मंडळींमध्ये इमरान हाश्मी याचाही समावेशआहे. इमरान हाश्मी महेश भट्ट यांचा भाचा आहे. त्या नात्यानं आलिया त्याची बहीण आहे. इमरान हाश्मीचे आजोबा सैयद शौकत हाश्मी हे देशाची फाळणी झाल्यानंतर पाकिस्तानात निघून गेले. तर पूर्णिमा या भारतामध्येच राहिल्या. त्यानंतर त्यांनी भगवानदास वर्मा यांच्याशी लग्न केलं. पूर्णिमाची बहिण शिरीन मोहम्मद अली ही महेश भट्ट यांची आई आहे.
आलियाचे आजी-आजोबा

आलिया भट्ट हिचे आजोबा म्हणजे सोनी राजदानचे वडील नरेंद्र नाथ आहेत. नरेंद्र नाथ काश्मिरी पंडित होते. ते शिक्षण घेण्यासाठी लंडनला गेले. तिथं त्यांची भेट गर्ट्रूड होल्जर यांच्याशी झाली. त्या जर्मन वंशाच्या होत्या. या दोघांमध्ये प्रेमाचं नातं फुललं आणि त्यांनी लग्न केलं. या दोघांच्या मुलीचा, सोनी राजदान हिचा जन्म बर्मिंघममध्ये झाला. त्यामुळे आलिया ही देखील ब्रिटिश नागरिक आहे.