मुंबई: राज्याचे गृहनिर्माण मंत्री यांच्या बंगल्यात अभियंत्याला झालेल्या मारहाणीवरून सुरू झालेल्या राजकीय वादात आता मनसेनं उडी घेतली आहे. मनसेच्या महिला नेत्या () यांनी आव्हाड यांचं समर्थन केलं आहे. ‘विकृत पोस्ट लिहिल्याबद्दल त्या अभियंत्याला मारहाण झाली असेल तर ते योग्यच झालं. अशा विकृतांना ठेचलंच पाहिजे,’ असं पाटील यांनी म्हटलं आहे.

अत्यंत घाणेरडी व आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल त्यांच्या आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी दोन दिवसांपूर्वी एका अभियंत्याला बेदम मारहाण केली होती. त्यावरून प्रचंड गदारोळ सुरू आहे. भाजपनं आव्हाड यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी राज्यपालांकडं केली आहे. आव्हाड यांनी आपली बाजू मांडताना संबंधित व्यक्तीनं केलेले ट्विट सोशल मीडियावर टाकले आहेत. अत्यंत विकृत भाषेतील या पोस्टमध्ये आव्हाड यांच्या कुटुंबीयांबद्दल आक्षेपार्ह लिखाण आहे.

वाचा:

आव्हाड यांनी केलेल्या या खुलाशानंतर रुपाली पाटील यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून मारहाणीच्या घटनेचं समर्थन केलं आहे. ‘काहीही पोस्ट, कमेंट करायच्या का? सोशल मीडिया हे विकृतीचं साधन नाही. असे विकृत उद्योग करायला यांचे मन धजावते कसे? मंत्री असो, सेलिब्रिटी असो की कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता त्यानं असल्या चुकीच्या पोस्ट करूच नयेत. अन्यथा मार खावा. विकृत कमेंट करणाऱ्यानं मार खाल्लाच आता त्याला कायदेशीर खटल्याचा सामनाही करावा लागेल. शिवाय अब्रूही गेली. कारण, बदनामी फक्त महिलेचीच होते असं नाही, पुरुषाचीही होते, तीही कुटुंबासकट,’ असं त्यांनी म्हटलं आहे. ‘सोशल मीडियावर ही विकृती संपलीच पाहिजे, करा सुरुवात,’ असं आवाहनही ठोंबरे यांनी केलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here