मुंबई : बॉलिवूडमधील सर्वात क्युट कपल अर्थात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी एकमेकांचा आयुष्यभरासाठी जोडीदार म्हणून स्वीकार केला आहे. रणबीर कपूरच्या वांद्रे येथील पाली हिल येथील ‘वास्तू’ येथे या दोघांनी सप्तपदी चालत एकमेकांना साता जन्मासाठी जोडीदार म्हणून वचन दिलं आहे. या दोघांच्या लग्नसोहळ्यामधील कोणतेही फोटो सोशल मीडियावर शेअर झालेले नाहीत. त्याबाबत लग्नस्थळी काटेकोर सुरक्षा व्यवस्था ठेवली होती.

आलिया भट्ट रणबीर कपूर


आलिया-रणबीरच्या लग्नसोहळ्यासाठी ‘वास्तू’ इमारतीबाहेरही कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आला आहे. अंबानींनी त्यांची सुरक्षा व्यवस्था या सोहळ्यासाठी पुरवली होती. तसंच मुंबई पोलिसांचीही कुमक तैनात ठेवलेली होती. दरम्यान, मीडियामध्ये आलेल्या रिपोर्ट्सनुसार, रणबीर आणि आलियाच्या लग्नसोहळ्यातील फोटो आणि व्हिडिओचे हक्क एका मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्मला काही कोटी रुपयांमध्ये विकण्यात आले आहेत.त्यामुळे येत्या काही महिन्यांत रणबीर आणि आलियाच्या लग्नाचे सर्व विधी, सेलिब्रिटी पाहुणे ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवले जाणार आहेत. लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओंसाठीचे हक्क या ओटीटी प्लॅटफॉर्मनं तब्बल ९० ते ११० कोटींना विकत घेतले आहेत.

चर्चा तर होणार! आलिया-रणबीरच्या फोटोंवर कतरिनानं केली अशी कमेंट की…

आलिया रणबीर

आलिया-रणबीरनं वास्तूमध्येच सप्तपदी घेतली.त्यामुळे या दोघांच्या चाहत्यांना त्यांच्या लग्नसोहळ्यातील फोटो आणि व्हिडिओसाठी वाट बघावी लागणार आहे. रणबीर आलियाच्या लग्नसोहळ्यात बॉलिवूडमधील मोजक्याच कलाकार मंडळींना आमंत्रित करण्यात आलं होतं. या दोघांचंही लग्न पंजाबी रितीरिवाजांनुसार झालं आहे. दरम्यान, सोशल मीडियावर आलिया आणि रणबीरचे काही मोजकेच फोटो शेअर करण्यात आले आहेत.

लग्नानंतर तुफान अंदाजात दिसले रणबीर- आलिया, पाहा Video

लग्नानंतर दोघांचा एकत्र असलेला सिनेमा ब्रह्मास्त्र सप्टेंबरमध्ये रिलीज होणार आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित या सिनेमात अमिताभ बच्चन, नागार्जुन यांच्या भूमिका आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here