मुंबई : लग्न म्हटलं की रूसवेफुगवे काही तुमच्याआमच्या लग्नसोहळ्यातच होतात असं नाही बरं… सेलिब्रिटींच्या घरातही मानपान असतो आणि त्याचं प्रतिबिंब त्यांच्या लग्नसोहळ्यात दिसत असतंच. बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर बॉलिवूड स्टार जोडी रणबीर कपूर आणि आलिया यांचं लग्न झालं. या लग्नाच्या सोहळ्याच्या चर्चेइतकाच एक विषय गाजला तो म्हणजे या लग्नाला कुणाकुणाला निमंत्रण दिलं जाणार. वऱ्हाडी मंडळींची यादी जेव्हा जाहीर झाली तेव्हा त्यात नवरी आलियाचे दोन्ही काका, मुकेश भट्ट आणि रॉबिन भट्ट यांचं नावच नव्हतं.

आलियाला मेंदी लागली तरी काकांना निमंत्रण पोहोचलं नव्हतं. त्यामुळेच पुतणी आलियाच्या लग्नात तिचे काका नसल्याची चर्चा होणार हे ओघाने आलंच. पण आलियाच्या लग्नाचे सगळे अपडेट देणारा आलियाचा भाऊ राहुल भट्ट याला आलियाची आई सोनी राजदान यांचा आदेशच होता की हे लग्न लागेपर्यंत दोन्ही काकांच्या अनुपस्थिबाबत चकार शब्दही काढायचा नाही.

आलिया भट्टच्या मंगळसूत्रात लपली रणबीरची खास गोष्ट

सोनी राजदान महेश आणि मुकेश भट्ट

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचं लग्न १४ एप्रिला दुपारी साडेतीनच्या मुहूर्तावर रणबीरच्या वास्तू या इमारतीतील आलिशान फ्लॅटमध्ये झालं. या लग्नासाठी कपूर आणि भट्ट कुटुंबातील जवळच्या व्यक्ती आणि आलिया-रणबीरचे मोजके मित्रमंडळच उपस्थित होते. रणबीरकडून त्याचे काका रणधीर कपूर, काकी नीतूदेवी, आत्यांची जैन फॅमिली, बहिणी रिध्दिमा, करिना, करिश्मा, जिजा सैफ अली खान, भावंडं आदर आणि अरमान जैन यांच्यासह कपूरांचा गोतावळा होता.

आलियाकडून वडील महेश भट्ट, आई सोनी राजदान, बहिणी शाहीन आणि पूजा तर भाऊ राहुल इतकेच वऱ्हाड होतं. पण आलियाच्या जवळच्या नातेवाईकांमध्ये काका मुकेश आणि रॉबिन यांची उपस्थिती नव्हती. भट्ट प्रॉडक्शनमधून फारकत झाल्याने त्यांच्यात असलेल्या वादामुळेच आलियाच्या काकांना निमंत्रितांच्या यादीत जमेत न धरल्याचं कारण सांगितलं जात आहे. हा निर्णय सोनी राजदान यांनीच घेतल्याचंही बोललं गेलं.

Ranbir-Alia Wedding: ‘चिंटू असता तर बेभान होऊन नाचला असता’


ऐन लग्नात आलियाचे काका का आले नाहीत हा प्रश्न विचारला जाणार हे सोनी राजदान यांनी ओळखलं होतं. म्हणूनच आलियाच्या लग्नाचे सगळे अपडेट देण्याची जबाबदारी असलेल्या राहुल भट्टला सोनी राजदान यांनी ताकीद दिली होती की आलिया आणि रणबीर यांच्या लग्नाचे सगळे विधी पूर्ण होईपर्यत तिच्या दोन्ही काकांच्या अनुपस्थितीबाबत चकार शब्दही काढायचा नाही. राहुलने हे आदेश पाळले असले तरी चाहत्यांमध्ये दबक्या आवाजात चर्चा झालीच.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here