mns banners shivsena bhavan | मनसेनेही ‘काल आज उद्या’ या थीमवर बॅनर तयार करत शिवसेनेला चोख प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. मनसैनिक हा बॅनर शिवसेना भवनासमोर लावण्यासाठी निघाले होते. तेव्हाच पोलिसांनी हा बॅनर ताब्यात घेतला. मनसेला शिवसेना भवनासमोर हा बॅनर लावता आला नसला तरी त्याची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

 

Raj Thackeray Kishori Pednekar
Kishori Pednekar | आम्ही भूमिका बदलल्या असतील पण तुमच्याप्रमाणे स्वार्थ साधण्यासाठी काहीही केलेले नाही.

हायलाइट्स:

  • मनसेचे नेते आम्ही ‘बी टीम’ म्हणजे बाळासाहेबांची टीम असल्याचे सांगत आहेत
  • बाळासाहेब ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचे वडील आहेत
मुंबई: बाळासाहेब ठाकरे हे हयात असताना मनसेने शिवसेना भवनावर दगडफेक केली, त्यांना यातना दिल्या. आता हीच मनसे बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने राजकारण करू पाहत आहे. मनसे आजपर्यंत बाकी सगळं हायजॅक करतच आली आहे, आता तुम्ही उद्धव ठाकरे यांचे वडीलही हायजॅक करणार का?, असा खोचक शब्दांत शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर (मनसे) निशाणा साधला. त्या शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
काल आज उद्या! तीच भाषा, तोच पॅटर्न; शिवसेनेच्या बॅनरला मनसेचं चोख प्रत्युत्तर
यावेळी किशोरी पेडणेकर यांनी शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी करणाऱ्या मनसेचा चांगलाच समाचार घेतला. शिवसेना भवनाला टार्गेट केल्याशिवाय किंवा शिवसेनेवर कुरघोडी केल्याशिवाय मनसेला टीआरपी मिळत नाही. आता मनसेचे नेते आम्ही ‘बी टीम’ म्हणजे बाळासाहेबांची टीम असल्याचे सांगत आहेत. बाळासाहेब ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचे वडील आहेत. त्यामुळे आता मनसे त्यांनाही हायजॅक करणार का? शेवटी मनसेला बाळासाहेब ठाकरे यांचा आधार घ्यावाच लागला, अशी टिप्पणी किशोरी पेडणेकर यांनी केली. तसेच शिवसेनेचे हिंदुत्व हे आजही प्रखर आहे. आम्ही भूमिका बदलल्या असतील पण तुमच्याप्रमाणे स्वार्थ साधण्यासाठी काहीही केलेले नाही. मित्र जेव्हा मित्र राहत नाही आणि समोरून मदतीचा हात पुढे आला तर तो पकडायचा असतो. बाळासाहेब ठाकरे यांनी मातोश्रीवर एका मुस्लीम व्यक्तीला नमाज अदा करून दिली होती. बाळासाहेब ठाकरे मुस्लिमांविषयी इतके उदारमतवादी होते. त्यामुळे मनसेने उगाच कोणाची तरी भूमिका घेऊन बोलू नये. ही भूमिका आपल्याला तरी पटतेय का, हे पाहावे. राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे कितीतरी मनसैनिक रागावले आहेत, नाराज झाले आहेत, असे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंनी मनसेला पुन्हा डिवचलं; भोंग्यांच्या भूमिकेवरुन खोचक टोला
‘घोडामैदान जवळच आहे, लवकरच कळेल’

मनसे सातत्याने शिवसेनेला टार्गेट करत आहे. पण मनसेने त्यांचं काम करावं, आम्ही चांगलं काम करतोय, ते आम्ही करत राहू. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचं घोडामैदान दूर नाही. लवकरच सर्वकाही स्पष्ट होईल, असेही किशोरी पेडणेकर यांनी म्हटले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : shivsena leader kishori pednekar takes a dig at mns chief raj thackeray
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here