मुंबई: या महिन्यात करणार, पुढच्या महिन्यात करणार… लग्नाची तयारी जोरदार सुरू आहे… या चर्चा कानांवर पडत असतानाच अखेर आलिया भट्ट-रणबीर कपूर या लव्हबर्ड्सनं शुक्रवारी संध्याकाळी लग्नगाठ बांधून सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला. लग्नापूर्वीचे विविध सोहळे आणि अखेर संध्याकाळी या दोघांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होताच चाहत्यांनी दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव केला. यानंतर सोशल मीडियावर अनेक मजेशीर मीम्स देखील व्हायरल झाल्याचं दिसून आलं.
नेटकऱ्यांनी आलिया आणि रणबीरला मीम्सचा आहेरचं दिलाय, असंच म्हणावं लागेल. सोशल मीडियावर आलिया आणि रणबीरच्या लग्नात आलेल्या पाहुण्यांवरही मीम्स बनवण्यात आले आहेत.
पाहुयात काही भन्नाट MEMS
करिना कपूर आणि करण जोहर यांचा हा फोटो. यात करण सिद्धार्थ जाधव सारखा दिसतोय का?

पांढऱ्याशुभ्र पेहरावातल्या फोटोंमध्ये नवरा-नवरी देखणे दिसत होते. आलिया आणि रणबीरच्या लग्नाला फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते. या लग्नात रणबीरचे बॉलिवूडमधील मित्र करण जोहर आणि अयान मुखर्जी सहभागी झाले होते. सप्तपदींनंतर आलिया आणि रणबीर मीडियाला भेटले. त्यांनी भरपूर पोज तर दिल्याच शिवाय नंतर रणबीरने आलियाचं चुंबन घेत तिला उचलून घेतलं आणि तो आपल्या घरी गेला.
