वॉशिंग्टन : अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयएचे (CIA) संचालक विल्यम बर्न्स यांनी यूक्रेन (Ukraine) विरोधातील युद्धात रशिया (Russia) अणवस्त्राचा वापर करु शकते असा इशारा दिला आहे. रशिया अणवस्त्राचा वापर करण्याची शक्यता असून त्याचा गांभीर्यानं विचार करण्याची गरज असल्याचं बर्न्स यांनी म्हटलं आहे. सीआयएच्या संचालकांच्या इशाऱ्यामुळं रशिया यूक्रेन युद्धात अणवस्त्राचा वापर होण्याची शक्यता वाढली आहे. मात्र, रशिया अणवस्त्राचा वापर करेल यासंदर्भातील अधिक माहिती मिळाली नसल्यांचं देखील त्यांनी म्हटलं आहे.
इमरान खान यांच्या सभेची गर्दी म्हणून नासानं काढलेला फोटो शेअर, PTI चा नेता सोशल मीडियावर ट्रोल
रशियानं २४ फेब्रुवारीला यूक्रेनवर आक्रमण सुरु केलं. दुसऱ्या महायुद्धानंतर यूरोपधील सर्वात मोठं युद्ध म्हणून याकडे पाहिलं जात आहे. रशियाच्या सुरक्षा परिषदेचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांचे निकटवर्तीय दमित्री मेदवेदवे यांनी स्वीडन आणि फिनलँड यांनी नाटोमध्ये प्रवेश केल्यास रशिया त्यांच्या कालिनग्राड येथे अणवस्त्र आणि हायपरसोनिक मिसाईल तैनात करणार असल्याचा इशारा दिला होता. दुसरीकडे फिनलँडच्या नाटोमध्ये जाण्यासंदर्भातील हालचाली सुरु झाल्या आहेत. फिनलँडची जनता नाटोतील सहभागाच्या बाजूनं आहे.

सीआयएचे संचालक विल्यम बर्न्स यांनी रशियाचं युद्धात झालेल्या नुकसानासंदर्भात भाष्य केलं आहे. रशिया कीव वर ताबा मिळवण्यात अपयशी ठरला आहे. काही भागातून रशियाला माघार घ्यावी लागली आहे आणि लांबत चाललेलं युद्ध यामुळं व्लादिमीर पुतीन हताश होऊन अणवस्त्र वापरु शकतात. यामुळं ही बाब गांभीर्यानं घेण्याची गरज आहे. रशियानं त्यांची अणवस्त्र सज्ज ठेवण्याचा निर्णय घेतला असला तरी यासंदर्भातील पुरावे मिळाले नाहीत, असं देखील ते म्हणाले आहेत.
यूक्रेनचं रशियाला प्रत्युत्तर? रेल्वे पुलावर एअरस्ट्राईक, खवळलेल्या मॉस्कोची हल्ल्याची धमकी

रशियाकडे ६ हजारांहून अधिक अणू बॉम्ब आहेत. रशियनं एअरफोर्स, नौदल आणि आर्मीच्या मदतीनं २ हजार अणू बॉम्ब शत्रूवर टाकू शकतात. रशिया जगातील सर्वाधिक अणू बॉम्ब असणारा देश आहे. त्यांच्याकडे झार बॉम्बा देखील आहे. जो जगातील सर्वात विनाशकारी अणू बॉम्ब आहे.

दरम्यान, रशिया आणि यूक्रेन यांच्यातील वाढता संघर्ष पाहता अमेरिका देखील सक्रीय झाली आहे. रशियानं यूक्रेनला अणू बॉम्बचा वापर करण्याची धमकी दिल्यानंतर अमेरिकेनं ब्रिटनमध्ये अणू बॉम्ब ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिका तब्बल १४ वर्षानंतर ब्रिटनमध्ये अणू बॉम्ब ठेवणार आहे. अमेरिकेनं यूक्रेनला देखील लष्करी मदत केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here