मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा विवाहसोहळा अखेर गुरुवारी, १४ एप्रिल रोजी पार पडला. अत्यंत खासगी आणि जवळच्या कुटुंबियांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा अत्यंत शाही पद्धतीनं पार पडला. या लग्नसोहळ्याबाबत अत्यंत गुप्तता पाळण्यात आली होती. इतकंच नाही तर लग्नसोहळ्याचे फोटो देखील सोशल मीडियावर आलिया आणि रणबीरनं संध्याकाळनंतर शेअर केले. या दोघांचं लग्न झाल्याची बातमी आल्यानंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी नवदांपत्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला.

आलिया रणबीर

रणबीर आणि आलियाला शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये रणबीरच्या दोन्ही एक्स गर्लफ्रेंड दीपिका पादुकोण आणि कतरिना कैफ यांचाही समावेश होता. त्याचप्रमाणे आलियाचा एक्स बॉयफ्रेंड सिद्धार्थ मल्होत्रा यानं देखील नव दांपत्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. या सर्व पोस्टची बॉलिवूडमध्ये खूपच चर्चा रंगली आहे.

लग्नात फक्त ४ फेरे घेऊन रणबीर- आलियाने बदलून टाकली परंपरा, भावाने सांगितलं त्याचं कारण

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी त्यांचा लग्नसोहळा अत्यंत खासगीपणाने केला. त्या सोहळ्याला दोन्ही कुटुंबातील अगदी जवळचे नातेवाईक आणि मोजके मित्रमंडळी उपस्थित होते. या सोहळ्याचे फोटो, व्हिडिओ लग्नानंतर सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. या दोघांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर करत एक सुंदर आणि तितकीच भावुक पोस्ट शेअर केली होती. या दोघांनी फोटो आणि पोस्ट शेअर केल्यानंतर दोघांच्या चाहत्यांबरोबरच बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला.


सिद्धार्थ मल्होत्राची खास पोस्ट

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचं लग्न झाल्याचं जाहीर झाल्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला.यामध्ये आलियाचा एक्स बॉयफ्रेंड आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रानंही पोस्ट लिहित नवदांपत्याला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सिद्धार्थनं त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ‘ तुम्हा दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा. यापुढे तुम्हा दोघांना खूप सारं प्रेम आणि सुख मिळो.’

सिद्धार्थ मल्होत्रानं दिल्या शुभेच्छा

रणबीरच्या दोन्ही एक्स गर्लफ्रेंडनीही दिल्या शुभेच्छा

दरम्यान, आलिया आणि रणबीरचं लग्न झाल्यानंतर त्यांना शुभेच्छा देणाऱ्या कलाकारांच्या मांदियाळीमध्ये दीपिका पादुकोण आणि कतरिना कैफ या रणबीरच्या दोन्ही एक्स गर्लफ्रेंडचाही समावेश होता. कतरिनानं नवदांपत्याला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात तिनं देखील नवदांपत्याला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

कतरिना कैफनं दिल्या शुभेच्छा

कतरिनाप्रमाणंच दीपिका पादुकोण हिनं देखील रणबीर आणि आलिया यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्याआहेत. तिनं कॉमेन्टमध्ये लिहिलं आहे की, ‘ तुम्हा दोघांना आयुष्यभरासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि प्रेम… तुमच्या आयुष्यात प्रेम आणि आनंद सदैव नांदो…’

आलिया-रणबीरच्या लग्नात सिद्धार्थ जाधव? नेटऱ्यांकडून MEMS चा आहेर

दीपिका पादुकोणच्याही शुभेच्छा

आलियाशी लग्न होण्यापूर्वी रणबीर कपूर आधी दीपिका आणि त्यानंतर कतरीना कैफ यांच्याबरोबर रिलेशनमध्येहोता. दीपिकानं रणबीरबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर रणवीर सिंह याच्याशी लग्न केलं. तर कतरिनानं देखील काही महिन्यांपूर्वी अभिनेता विकी कौशल याच्याशी लग्न केलं.

या दोघींशी ब्रेकअप झाल्यानंतर रणबीरच्या आयुष्यात २०१८ मध्ये आलिया आली. या दोघांची पहिली भेट ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमाच्या सेटवर झाली. त्यानंतर त्यांच्यात प्रेमाचं नातं फुललं. रणबीरबरोबर सूर जुळण्याआधी आलिया आणि सिद्धार्थ मल्होत्रा काही वर्ष रिलेशनमध्ये होते. परंतु त्यांच्यात काही कारणामुळे दुरावा आला. सध्या सिद्धार्थ मल्होत्रा अभिनेत्री कियारा अडवाणी हिच्याबरोबर रिलेशनमध्ये आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here