नवी दिल्ली : मागील दोन संपूर्ण जग करोना महामारीशी तोंड देत असताना यांनी प्रवाहाच्या विरोधात जाऊन औद्योगिक डावपेच यशस्वी करुन दाखवले आहेत. गौतम अदानी यांच्या संपत्तीत दोन वर्षात तब्बल १४ पटीने वाढ झाली आहे. फोर्ब्स या संस्थेनुसार १५ एप्रिल २०२२ पर्यंत गौतम अदानी यांची एकूण संपत्ती १२१.७ अब्ज डाॅलर (भारतीय चलनात सुमारे ९३००० कोटी रुपये) इतकी वाढली आहे. फोर्ब्सच्या श्रीमंत उद्योजकांच्या यादीच गौतम अदानी आता सहाव्या स्थानावर विराजमान झाले आहेत.

करोना संकट काळात अदानी समूहाने चौफेर विस्तार केला. याच काळात अदानी समूहाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे व्यवस्थापनाचे हक्क मिळवले. ग्रीन एनर्जीबाबत अदानी समूहाने मोठी गुंतवणूक केली आहे. त्याचाच परिणाम गौतम अदानी यांच्या संपत्तीवर झाला आहे. गौतम अदानी यांची एकूण संपत्ती १२१.७ अब्ज डाॅलर इतकी वाढली आहे.

फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार २०१७ मध्ये गौतम अदानी यांची एकूण संपत्ती ५.८ अब्ज डाॅलर इतकी होती. जगभरातील श्रीमंत गुंतवणूकदारांच्या यादीत ते २५० व्या स्थानावर होते. २०१८ मध्ये त्यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आणि एकूण संपत्तीचा आकडा ९.७ अब्ज डाॅलरपर्यंत वाढला. २०२० आणि २०२१ मध्ये अदानी यांची घोडदौड कायम राहिली. १५ फेब्रुवारी २०२२ रोजी अदानी यांची एकूण संपत्ती ८३.६ अब्ज डाॅलर होती. अवघ्या दोन महिन्यात त्यात प्रचंड वाढ झाली असून ती १२१.७ अब्ज डाॅलर इतकी झाली आहे.

अदानी समूहाचे सर्वच शेअर मागील तीन महिन्यात वधारले आहेत. ज्यात अदानी एनर्जी, अदानी टोटल गॅस, अदानी पोर्ट,अदानी पाॅवर, अदानी विल्मर, अदानी एंटरप्राइजेस, आणि अदानी ट्रान्समिशनचा या शेअरने दमदार कामगिरी केली आहे.


अदानी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी देशातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. ‘ब्लूमबर्ग बिलिनिअर इंडेक्स’नुसार नुकताच अदानी यांनी एकूण संपत्तीच्या बाबतीत १०० अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडला होता. काही महिन्यांपूर्वी त्यांनी आशिया खंडातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती ठरण्याचा मान पटकावला होता. आतापर्यंत ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’चे सर्वेसर्वा आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती होते.

गौतम अदानींविषयी थोडक्यात माहिती

– १९८०मध्ये मुंबईत हिरे व्यापारी म्हणून सुरुवात. विसाव्या वर्षी लखपती.

– १९९७मध्ये अंडरवर्ल्ड डॉन फजलू अहमद याने अदानींचे अपहरण केले होते.

– हॉटेल ताजवर २००८मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी अदानी तेथे अडकले होते.

– अदानींनी शालेय शिक्षण अर्ध्यातच सोडले होते. अहमदाबादमधील ‘सीएन’ स्कूलमध्ये शिकत होते.

– अदानी पॉवर ही देशातील सर्वांत मोठी सौर ऊर्जा उत्पादक कंपनी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here