मुंबई: दिल्लीत तबलिगी जमातीच्या ”च्या आयोजनाला परवानगी दिल्याबद्दल केंद्र सरकारवर प्रश्नांच्या फैरी झाडणारे राज्याचे गृहमंत्री यांना भाजपनं आता प्रतिप्रश्न केले आहेत. भाजपचे माजी खासदार यांनी राज्यातील तबलिगींचा हिशेब गृहमंत्री देशमुख यांच्याकडं मागितला आहे. राज्यातील किती तबलिगी गायब आहेत याचं उत्तर द्या, असं सोमय्यांनी म्हटलं आहे.

दिल्लीतील निजामुद्दीन इथं झालेल्या ‘मरकज’वरून देशात सध्या राजकारण रंगलं आहे. ‘मरकज’मुळं देशात करोनाचा संसर्ग वाढल्याचे आरोप एकीकडं होत असताना देशमुख यांचं एक पत्रक काल व्हायरल झालं. त्यांनी त्यांनी दिल्लीतील मरकजच्या आयोजनावरून केंद्र सरकारला प्रश्न विचारले होते. महाराष्ट्रातील वसई-विरार भागात तबलिगी जमणार होते. मात्र, आम्ही त्यांना परवानगी नाकारली. मग केंद्र सरकारनं दिल्लीत त्यांना परवानगी का दिली,’ असा प्रश्न देशमुख यांनी केला होता. त्याचबरोबर, अन्य अनेक शंका उपस्थित केल्या होत्या.

देशमुख यांच्या या पत्राला उत्तर म्हणून सोमय्या यांनी एक ट्विट केलं आहे. त्यांनी त्यांनी ‘तबलिगीं’च्या मुद्द्यावरून गृहमंत्र्यांना घेरलं आहे. ‘महाराष्ट्रातून १५०० तबलीगी दिल्ली गेले. मुख्यमंत्री म्हणतात ते सगळे सापडले. गृहमंत्री सांगतात दीड हजारमधील ५० तबलिगी गायब आहेत. आरोग्यमंत्री म्हणतात १०० जणांचा पत्ता नाही. तर, पोलीस म्हणतात १५० फरार आहेत. आता गृहमंत्र्यांनीच नेमके किती तबलिगी गायब आहेत याचा हिशेब द्यावा, असं सोमय्यांनी म्हटलं आहे. ‘तबलिगींमुळं महाराष्ट्राचं किती नुकसान झालं. त्यांना शोधण्यात एवढा उशीर का झाला,’ अशी विचारणाही सोमय्यांनी केली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here