१ जुलैपासून मोफत वीज मिळणार
पंजाबमध्ये आपची सत्ता आल्यानंतर विरोधी पक्षांकडून मोफत वीज कधीपासून देण्यात येणार यासंदर्भातील प्रश्न विचारले जात होते. भगवंत मान यांच्या सरकारकडून आतापर्यंत यासंदर्भात कोणतेही उत्तर दिले जात नव्हते. मात्र, आज पंजाबमधील वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये १ जुलैपासून मोफत वीज देण्यात येईल, अशी घोषणा केली आहे.
आप सरकारचं रिपोर्ट कार्ड जाहीर
पंजाबमध्ये आपचं सरकार आल्यानंतर भगवंत मान यांनी २५ हजार पदांची सरकारी नोकर भरती करणार असल्याची घोषणा केली आहे. कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्या ३५ हजार कर्मचाऱ्यांना नियमित करण्यात येणार आहे. दरमहा देण्यात येणारं राशन घरपोहोच करण्याचा निर्णय देखील आप सरकारनं घेतला आहे. दुसरीकडे भ्रष्टाचार विरोधी हेल्पलाईन देखील सुरु करण्यात आली आहे.
खासगी शाळांना शालेय फीमध्ये वाढ न करण्याचा निर्णय देखील आप सरकारच्यावतीनं घेण्यात आला आहे. गँगस्टर्स विरोधात टास्क फोर्स स्तापन करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तांना गँगस्टर विरोधात कठोर कारवाई करावे, असे आदेश देण्यात आले आहेत. ग्रामीन विकास निधीसाठी १००० कोटींची घोषणा करण्यात आली आहे. सरकारी कार्यालयात शहीद भगतसिंह आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची छायाचित्र सरकारी कार्यालयात लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना १०१ कोटींची मदत जाहीर करण्यात आली. एक आमदार एक टर्म पेन्शन देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. आप आमदारांना जनतेसाठी पूर्णवेळ उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.