पुणे बातम्या आजच्या: गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणी वाढणार, पुणे पोलिसांनाही हवा ताबा – pune police also want possession of adv gunaratna sadavarte pune news today
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई येथील निवास स्थानावर झालेल्या हल्ला प्रकरणातील आरोपी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पुण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात पुणे पोलिस ताबा घेण्याची शक्यता आहे. अॅड. सदावर्ते हे सध्या सातारा पोलिसांच्या ताब्यात आहेत.
सातारा व कोल्हापूर येथील राजे व खासदाराविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपावरून २०२० मध्ये अॅड. सदावर्ते यांच्यावर पुण्यात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पुणे पोलीस करीत असून दोषारोपपत्र दाखल करण्यासाठीचा प्रस्ताव पुणे पोलिसांनी मान्यतेसाठी नुकताच गृहविभागाकडे पाठविला आहे. शरद पवारांच्या दौऱ्यात भाजप-मनसे आक्रमक; हनुमान चालीसाचं करणार पठण या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपासासाठी अॅड. सदावर्ते यांचा ताबा पुणे पोलीस घेण्याची शक्यता आहे. सदावर्ते यांना शुक्रवारी सातारा न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांची कोठडी संपल्यानंतर त्यांचा ताबा पुणे पोलीस घेऊ शकतात. दरम्यान, साताऱ्यातील छत्रपती घराण्यावर टीका केल्याप्रकरणी सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळं काल सातारा जिल्हा व सत्र न्यायालयात गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर कोर्टाने गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस कोठडी सुनावली.