मुंबई : जवळचे नातेवाईक आणि मोजके मित्रमंडळ यांच्या साक्षीने आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी सहजीवनाला सुरुवात केली. या दोघांच्या लग्नाची गेल्या काही दिवसांपासून जितकी चर्चा होती ती पाहता हे लग्न मोठ्या डामडौलात होईल अशी अनेकांना अपेक्षा होती. पण अगदी साध्या पध्दतीने आलिया कपूरांच्या घरी सून म्हणून आली. अर्थात लग्न जरी घरच्या घरी झालं असलं तरी आलिया आणि रणबीर यांनी पंजाबी रितीरिवाजानुसार प्रत्येक विधी पूर्ण करण्याला पसंती दिली होती. पण ऐन लग्नातील सप्तवचन देत असताना सहावं वचन झाल्यानंतरच्या सातव्या वचनावेळी आलियाचे वडील महेश भट्ट यांनी हा विधी रोखला आणि थेट सातव्या वचनावरून भटजीबुवांचीच शाळा घेतली. शेवटी सातवं वचन न देताच आलिया-रणबीर यांच्या लग्नाचे विधी पूर्ण करण्यात आले.

रणबीर कपूर आलिया भट्ट

रणबीरच्या वास्तू या आलिशान फ्लॅटच्या बाल्कनीत लग्नविधी सुरू होते. सुरुवातीचे सगळे विधी पूर्ण झाल्यावर नवरानवरी एकमेकांना सात वचनं देतात हा विधी सुरू झाला. पहिली सहा वचनं आलिया आणि रणबीरने एकमेकांना दिली आणि आता सातवं वचन आलिया देणार इतक्यात महेश भट्ट यांनी आलियाला नेमकं तेच वचन देण्यापासून थांबवलं. सातवं वचन असं होतं की आलिया पत्नी म्हणून रणबीर जे सांगेल त्याप्रमाणेच वागेल. याच वचनाला महेश भट्ट यांनी आक्षेप घेतला. एखाद्या सिनेमाच्या लग्नमंडपातील सीन वाटावा असा हा सीन झाला.

Photo: ‘बस तेरा नाम दोहराए’ असं म्हणत कुणाला मिस करतेय सारा तेंडुलकर?

यावर महेश भट्ट यांचं म्हणणं असं होतं की त्यांनी त्यांच्या आणि आलियाची आई सोनी राजदान यांच्या लग्नातही सोनी यांना हे वचन घेऊ दिलं नव्हतं आणि आलियालाही ते हे वचन घेऊ देणार नाहीत. महेश भट्ट यावेळी म्हणाले, मी माझ्या मुलीला आलियाला तिचे निर्णय स्वतंत्रपणे घेण्यासाठी बळ दिलं आहे. ती तिचे निर्णय घेण्यासाठी मुक्त असली पाहिजे. इतकं बोलून त्यांनी आलियाकडे मोर्चा वळवला आणि तिलाही विचार करूनच हे सातवं वचन दे असं सांगितलं. आलियानेही वडिलांचं म्हणणं मान्य असल्याचे सांगत सातवं वचन न देता रणबीरशी लग्नाचे विधी पूर्ण केले.

‘रणबीर जावई नाही तर मुलगाच’, लेकीची पाठवणी करताना सोनी राजदानच्या डोळ्यात पाणी

सोनी राजदान महेश भट्ट लग्नासाठी तयार

खरं तर आलियाच्या लग्नाचा खर्च वडील म्हणून महेश भट्ट यांनी केला नसून सगळी जबाबदारी आलियानेच घेतली आहे. तर गेल्या काही दिवसांपासून लग्नाचे जे विधी सुरू आहेत त्यामध्येही महेश भट्ट फारसे सहभागी झाले नव्हते. त्यात ऐन सप्तपदी विधीत सातव्या वचनाच्यावेळी महेश भट्ट यांनी घेतलेला पवित्रा चर्चेचा विषय ठरला.

रणबीर आलिया

आलिया आणि रणबीरचं लग्न तर झालं, आता चर्चा सुरू झालीय ती त्यांच्या रिसेप्शनची. अवघ्या ५० माणसांच्या उपस्थितीत लग्न उरकल्यानंतर बॉलिवूड इंडस्ट्रीतील सेलिब्रिटी पाहुण्यांसाठी रिसेप्शन करणार असल्याचे या जोडीने म्हटलं होतं. पण अजून तरी रिसेप्शनच्या तयारीची काहीच हालचाल दिसत नाहीय. असंही बोललं जातंय की आलिया आणि रणबीर हनिमूनला जाणार आहेत आणि हनिमूनहून परतल्यानंतर रिसेप्शन द्यायचं की नाही यावर ते विचार करणार आहेत. त्यामुळे लग्नाला नाही तर नाही पण रिसेप्शनच्या निमंत्रणाची वाट पाहणाऱ्यांना अजून तरी बोलावणं आलेलं नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here