कीव :रशिया (Russia) आणि यूक्रेन (Ukraine) यांच्यातील युद्धाला २४ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली होती. रशिया आणि यूक्रेन यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्ह आहेत. रशिया यूक्रेनवर अणूबॉम्ब टाकू शकतो, अशी शक्यता अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयएचे विल्यम बर्न्स यांनी वर्तवली आहे. दुसरीकडे यूक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की ( Volodymyr Zelenskryy) यांनी आतापर्यंत यूक्रेनचे ३ हजार सैनिक मारले गेल्याचा दावा केला आहे. तर, रशियाच्या १९ ते २० हजार सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती झेलेन्स्की यांनी दिली आहे. यूक्रेनचे जवळपास १० हजार सैनिक जखमी झाले आहेत. जखमी सैनिकांपैकी किती बचावतील हे सांगणं अवघड असल्याचं देखी झेलेन्स्की यांनी म्हटलं.
Russia Ukraine : पुतीन यूक्रेनवर अणूबॉम्ब टाकतील, जगातील सर्व देशांनी तयार राहावं, झेलेन्स्कींचा इशारा
रशियन सैन्य यूक्रेनच्या सामान्य जनतेवर हल्ला करत आहेत. कीवच्या क्षेत्रीय पोलीसदलाचे प्रमुख एंड्री नेबितोव यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. राजधानी कीवमध्ये ९०० हून अधिक नागरिकांचे मृतदेह आढळून आल्याचं ते म्हणाले. नागरिकांचे मृतदेह रस्त्यांवर टाकण्यात आलेले आहेत. पोलिसांनी ९५ टक्के नागरिकांचा मृत्यू स्नाइपर आणि गोळी लागल्यानं झाल्याचं म्हटलं आहे.

यूक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी दक्षिण खेरसोन आणि जैपसोरिजियामध्ये रशियाचं सैन्य सामान्य नागरिकांना निशाणा बनवत असल्याचा आरोप केला आहे. सामान्य नागरिक, सरकारी कर्मचारी आणि सैन्यदलातील जवानांवर हल्ला करत असल्याचं झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे.
World War Three: तिसरे महायुद्ध सुरू झाले!; रशियाच्या सरकारी TV चॅनेलवर घोषणा
रशियन संरक्षण मंत्रालयाकडून कीव वर क्षेपणास्त्रांचा हल्ले वाढवण्यात आले आहेत. यूक्रेननं काळा समुद्रात मिसाईल हल्ला करुन रशियन युद्ध नौका मोस्कवा नष्ट केली होती. रशियातील बेलगोरोड परिसरात यूक्रेनच्या संरक्षण दलांकडून हल्ले करण्यात आले होते. यानंतर कीववर हल्ले करण्यात येतील असा इशारा देखील रशियाकडून देण्यात आला होता.

गव्हर्नर ओलेह सिनेहुबोव यांनी पूर्व यूक्रेनवर रशियाकचे सातत्यपूर्ण हल्ले सुरु असल्याचं म्हटलं आहे. मारियुपोलच्या दक्षिणेकडील शहरात देखील युद्ध सुरु आहे. खारकीव शहरात देखील गोळीबारात ७ महिन्यांच्या लहान बाळासह सात नागरिकांचा मृत्यू झाला असून ३४ जण जखमी झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here