पुणे : आज हनुमान जयंतीच्यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने रोजा इफ्तार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. एकीकडे राज्यात मशिदीवरील भोंगे काढा नाहीतर हनुमान चालीसा लावू अशी भूमिका मनसेने घेतली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारलं असता त्यांनी राज्यात काहीतरी अघटित घडवण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं आहे.

‘आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने रोजा इफ्तार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. याला सर्व धर्मीय समभाव म्हणतात. ज्यात सगळ्यांचा सन्मान ठेवला जात आहे. महाराष्ट्रात जाणीवपूर्वक जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत असून पुढे राज ठाकरे यात आग्रह करणार आणि थोड्या दिवसांत ओवेसी पिक्चरमध्ये येणार आणि या राज्यात जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार’ अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे.

Kolhapur By Election Result : उत्तर कोल्हापुरात काँग्रेस विजयाच्या उंबरठ्यावर, भाजपचं काय?
दरम्यान, राज्यात एकीकडे महागाई वाढत जात आहे. यावर चर्चा होत नाही तर हनुमान चालीसावर चर्चा होणार. जाणीवपूर्वक देवाचा वापर आम्ही कधी केला नाही आणि तसा वापर सध्या सुरू आहे असंही यावेळी पाटील म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची परिवार संवाद यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जलसंपदामंत्री तथा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार सुप्रिया सुळे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार वंदनाताई चव्हाण, उपस्थित राहणार असून यात शहरातील सर्वच मतदार संघाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात येणार आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बोलत होते.

काँग्रेसचाच उमेदवार जिंकणार

उत्तर कोल्हापूर निवडणुकीत आमची अपेक्षा आहे की काँग्रेसचाच उमेदवार जिंकांवा. महाविकास आघाडी सरकारच्या सर्व नेत्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं आहे. जेव्हा तिन्ही पक्ष एकत्र येतात तेव्हा भाजपचा पराभव कठीण नाही. आम्हाला खात्री आहे की आमचा उमेदवार विजयी होईल, असं यावेळी पाटील म्हणाले.

गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणी वाढणार, पुणे पोलिसांनाही हवा ताबा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here