वॉशिंग्टन : भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी अमेरिकेतून (America) थेट चीनला (China) इशारा दिला आहे. भारताला डिवचण्याचा किंवा नुकसान करण्याचा प्रयत्न केल्यास प्रत्युत्तर दिलं जाईल, असं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात भारत बलशाली देश बनला आहे. आता जगातील मोठ्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश होतो. त्यामुळं आम्हाला कुणी डिवचण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना सोडणार नाही, असा इशारा राजनाथ सिंह यांनी दिला आहे. ते सॅनफ्रान्सिस्को येथील अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीय समुदायासमोर ते बोलत होते. यावेळी राजनाथ सिंह यांनी अमेरिकेला देखील सूचक इशारा दिला आहे. अमेरिकेला भारत झिरो सम गेम या कुटनीतीमध्ये विश्वास ठेवत नसल्याचं म्हटलं आहे.
Russia Ukraine : पुतीन यूक्रेनवर अणूबॉम्ब टाकतील, जगातील सर्व देशांनी तयार राहावं, झेलेन्स्कींचा इशारा
राजनाथ सिंह अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसीमध्ये आयोजित द्वीपक्षीय चर्चेसाठी गेले आहेत. यानंतर त्यांनी सॅनफ्रान्सिस्को येथे भेट दिली. भारतीय वाणिज्य राजदूत कार्यालयाकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राजनाथ सिंह बोलत होते. भारतीय सैनिकांनी चीन सीमेवर शौर्य दाखवल्याचं त्यांनी म्हटलं. भारतीय सैनिकांच्या धाडसाचं राजनाथ सिंह यांनी कौतुक केलं. भारताला कोणी डिवचण्याचा प्रयत्न केल्यास भारत प्रत्युत्तर देईल, हा संदेश चीनकडे गेला आहे, असं देखील ते म्हणाले आहेत.

पैगाँग सरोवर क्षेत्रात हिसंक झटापट झाल्यानंतर ५ मे २०२० मध्ये भारतीय आणि चीन यांच्यातील सैन्यामध्ये तणाव वाढला होता. १५ जून २०२० मध्ये गलवान खोऱ्यात झटापट झाली होती त्यात भारताचे २० जवान शहीद झाले होते. याबद्द्ल चीननं कोणतीच माहिती दिली नव्हती.
World War Three: तिसरे महायुद्ध सुरू झाले!; रशियाच्या सरकारी TV चॅनेलवर घोषणा
अमेरिका रशिया आणि यूक्रेन यांच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचं समोर आलं होतं. यासंदर्भात अमेरिकेचं नाव न घेता राजनाथ सिंह यांनी झिरो सम गेम या कुटनीतीमध्ये भारत विश्वास ठेवत नसल्याचं ते म्हणाले.भारताचे एका देशाशी चांगले संबंध आहेत याचा अर्थ दुसऱ्या देशाशी संबंध खराब व्हावेत, असं वाटत नसल्याचे ते म्हणाले.

भारत कायम आंतरराष्ट्रीय पातळीवरील संबंध ठेवत असताना दोन्ही देशांचा फायदा व्हावा, अशा प्रकारच्या धोरणामध्ये विश्वास ठेवतो, असं राजनाथ सिंह म्हणाले आहेत. भारतानं रशियाकडून कच्चं तेल खरेदी करण्याच्या मुद्यावर अमेरिकेकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांनी भारत आता शक्तीशाली देश बनला असल्याचं म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here