कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक: उत्तर कोल्हापुरच्या निकालावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले… – ajit pawar first reaction to the north kolhapur election result
पुणे : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. ही निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशी पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे उमेदवार जयश्री जाधव हे पहिल्या फेरीपासूनच लीडमध्ये आहे.
यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, सगळ्यांचं म्हणणं होत की, कोल्हापूर येथील जागा निवडून येणार, मतदानापर्यंत खूप वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा झाल्या. महाविकास आघाडीच्या उमेदवारचं काम शिवसेनेनं मनापासून केलं. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनीदेखील बारकाईने लक्ष घातलं. तसेच शिवसेनेचे अनेक माजी नगरसेवक तिथे प्रचाराला गेले. तीच गोष्ट काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बाबतीत घडली. आम्ही सगळेच तीथे प्रचाराला गेलो होतो. आम्हाला काही निवडून येण्याची अडचण वाटत नाही, असंदेखील यावेळी पवार म्हणाले. भोंगा प्रकरणात आता ओवेसींची एन्ट्री होणार; जयंत पाटलांचं भाकीत
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची परिवार संवाद यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जलसंपदामंत्री तथा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार सुप्रिया सुळे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार वंदनाताई चव्हाण उपस्थित राहणार असून यात शहरातील सर्वच मतदार संघाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात येणार आहे. यावेळी अजित पवार बोलत होते.