या पोटनिवडणुकीसाठी राज्य पातळीवरील नेते आणि कार्यकर्त्यांची जोरदार प्रचार फौज उतरली होती. आरोप-प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापलं होतं. अशात पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती. पण आता काँग्रेस यावरून भाजपला कशाप्रकारे टार्गेट करतं हे सुद्धा आता पाहणं महत्त्वाचं आहे.
Kolhapur LIVE : अठराव्या फेरीत भाजपचं टेंन्शन वाढलं; काँग्रेसचा विजय निश्चित?
या निवडणुकांमध्ये हिंदुत्व आणि स्वाभिमान असे मुद्दे प्रचारात आले होते. काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी आपले हिंदुत्व आणि स्वाभिमान विजयी झाला, अशी प्रतिक्रिया दिली आहे. इतकंच नाही तर संपूर्ण शहरात त्यांच्या विजयाचे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. महाविकास आघाडी भक्कम असल्याचा पुरावा देण्यासाठी आघाडीच्या नेत्यांसाठी ही निवडणूक महत्त्वाची होती. त्यामुळे ठाकरे सरकारचा हा विजय २०२४ च्या निवडणुकांसाठी देखील महत्त्वाचा असणार आहे.
या निकालाचा नक्कीच २०२४ च्या निवडणुकांवर परिणाम पाहायला मिळेल. दरम्यान, या विजयानंतर आता महाविकास आघाडीमध्येच काही राजकीय खलबतं होतात का? हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण काँग्रेस उमेदवार उत्तर कोल्हापुरात निवडून आल्यामुळे २०२४ मध्ये काँग्रेस या जागेवर आपला हक्क सांगू शकते. त्यामुळे शिवसेनेसाठी कुठेतरी ही बाब अडचणीची ठरू शकते.