Raj Thackeray |१९८७ च्या विलेपार्ले येथील पोटनिवडणुकीत बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाची गर्जना केली होती. ती निवडणूक बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जिंकून दाखवली, याची मला आठवण झाली. आता काहीजण शिवसेनाप्रमुखांची भ्रष्ट कॉपी करणअयाचा प्रयत्न करत आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले.

 

Rohit Pawar Raj Thackeray
Rohit Pawar| मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी नरेटिव्ह सेट केले जात आहे. राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांची कॉपी करत आहेत.

हायलाइट्स:

  • राज ठाकरे यांच्या भाषणाची स्क्रिप्ट ही भाजपने लिहून दिली होती
  • मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी नरेटिव्ह सेट केले जात आहे
पुणे: केवळ अंगावर भगवी शाल पांघरून बाळासाहेब ठाकरे होता येत नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा नेता एकदाच होतो, तो पुन्हा घडत नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर निशाणा साधला. राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे शाल अंगावर घेतात. पण लक्षात घ्या की, कुठलाही नेता पुन्हा घडत नसतो. पवार साहेब परत घडणार नाहीत, बाळासाहेब ठाकरे परत घडणार नाहीत, असे रोहित पवार यांनी म्हटले. ते शनिवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. राज ठाकरे यांच्या भाषणाची स्क्रिप्ट ही भाजपने लिहून दिली होती. मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी नरेटिव्ह सेट केले जात आहे. राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांची कॉपी करत आहेत. ते ज्या पद्धतीने अंगावर शाल घेतात, त्यावरून हे समजते. राज ठाकरे हे चांगले अभिनेते आहेत, ते चांगला अभिनय करतात, असेही रोहित पवार यांनी म्हटले. आता मनसेच्या गोटातून रोहित पवार यांच्या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, हे पाहावे लागेल.
MNS: संजय राऊत यांच्याविरोधात मनसे आक्रमक; थेट ‘सामना’च्या कार्यालयाबाहेर लावला बॅनर
नवहिंदुत्ववादी ‘ओवेसी’च्या माध्यमातून भाजपचं भोंग्यांचं राजकारण: संजय राऊत

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात भाजपने हनुमान चालिसा आणि भोंग्यांच्या मुद्द्यावरून घाणेरडे राजकारण केले. तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याचा निवडणुकीवर परिणाम होईल, असे भाजपला वाटले होते. पण कोल्हापूरच्या जनतेते भाजपचे भोंगे खाली उतरवले. भाजप नवहिंदुत्ववादी ‘ओवेसी’ आणि ‘एमआयएम’च्या माध्यमातून जे राजकारण करू पाहत आहे, ते यशस्वी होणार नाही, हे कोल्हापूरमधील पोटनिवडणुकीच्या निकालाने सिद्ध केल्याचे मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : ncp mla rohit pawar taunts mns chief raj thacekray over copying balasaheb thackeray
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here