आलियानं या मेंदी सोहळ्याचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये एक फोटो अत्यंत हृदयस्पर्शी आहे. आलियानं शेअर केलेल्या फोटोमध्ये रणबीरनं वडिलांचा म्हणजे ऋषी कपूर यांचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो हातात घेतला आहे. रणबीरचं आणि त्याच्या वडिलांचं खूप खास नातं होतं. त्या दोघांचं बाँडिंग या फोटोमधूनही दिसत आहे. मेंदीच्या सोहळ्यावेळी रणबीर वडिलांच्या आठवणीमध्ये खूपच भावुक झाला होता.
नवरी नटली! आलियाच्या दागिन्यावरून नजर हटेना, रणबीरचं होतं खास गिफ्ट
एकीकडे रणबीरनं त्याच्या वडिलांचा फोटो हातात घेऊन दिसत आहे तर दुसरीकडे तो मेंदीच्या विधींवेळी त्याची आई नीतू हिच्याबरोबर डान्स करताना दिसत आहे. या फोटोमध्ये रणबीरच्या बहिणी रिद्धिमा कपूर साहनी, करिना कपूर देखील दिसत आहेत.

रणबीरचं आपल्या वडिलांवर खूप प्रेम. म्हणून त्यांनं लग्नात त्यांचं घड्याळ हाताला बांधलं होतं. रणबीरसाठी ऋषी यांचं हे घड्याळ लाखमोलाचं होतं. अर्थात ऋषी कपूर हे जे घड्याळ वापरायचे खऱ्या अर्थानं लाखमोलाचं होतं कारण त्याची किंमत २१ लाख रुपये इतकी होती. या घड्याळाला निळ्या रंगाचा पट्टा होता आणि ते घड्याळ १८ कॅरेटच्या पांढऱ्या सोन्यापासून (प्लॅटिनम) बनवलेलं आहे.
रणबीर-आलियाचा मेंदी समारंभ, प्रत्येक फोटो आहे सुंदर
रणबीरचे वडील अभिनेते ऋषी कपूर यांचं ३० एप्रिल २०२० कॅन्सरनं निधन झालं. ऋषी यांना कॅन्सरची लागण झाल्याचं समजलं तेव्हा त्यांच्यावर न्यूयॉर्क इथं जाऊन उपचार करण्यात आले. त्यानंतर ते बरे झाले आणि मुंबईत परतले. मुंबईला परत आल्यानंतर त्यांनी सिनेमात कामही केलं. परंतु त्यांची तब्येत पुन्हा बिघडली. अखेर ६७ व्या वर्षी ऋषी कपूर यांचं निधन झालं.