मुंबई: आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकला. मुंबईने लखनौला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले. आज सकाळपासून मुंबई या सामन्यात सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला संधी देईल अशी चर्चा होती. पण प्रत्यक्षात तसे झाले नाही.

वाचा- पराभवाचा षटकार की विजयाची श्री गणेशा; लकी मैदानावर मुंबई

आयपीएल २०२२मध्ये सलग पाच पराभव झालेल्या मुंबई इंडियन्ससाठी ही लढत फारच महत्त्वाची आहे. मुंबईने या सामन्यासाठी एक मोठा बदल केलाय. बेसिल थंपीच्या जागी फॅबियन ऍलनचा संघात समावेश करण्यात आला आहे. याआधी मुंबईचा २०१५च्या हंगामात सलग पाच पराभव झाले होते. तेव्हा मुंबईने अखेरीस चौथे स्थान मिळवले होते.

वाचा- टॉपलेस होऊन महिला Live सामन्यात मैदानात घुसली; पाहा व्हिडिओ

सामना सुरू होण्याआधी फॅबियन ऍलनला मुंबई इंडियन्सची कॅप देण्यात आली.

असा आहे मुंबई इंडियन्सचा संघ- रोहित शर्मा, ईशान किशन, डेवाल्ड ब्रेविस,तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड, फॅबियन ऍलन, जयदेव उनाडकट, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह आणि टायमल मिल्स

लखनौचा संघ-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here