लंडन : पाकिस्तानमधील (Pakistan) राजकीय घडामोडींचे पडसाद ६२०० किमी अंतरावर असणाऱ्या ब्रिटनमध्येही दिसत आहेत. एकीकडे पाकिस्तानातील सत्ता इमरान खान (Imran Khan) यांना सोडावी लागली आहे. नवाज शरीफ यांच्या मुस्लीम लीग नवाज समर्थक आणि इमरान खान यांच्या पाकिस्तान तहरीक ए इन्साफ पार्टीचे (PTI) समर्थक इंग्लंडमध्येही आमने सामने आले आहेत. गेल्या शनिवारी नवाज शरीफ यांच्या घराबाहेर दोन्ही पक्षांचे समर्थक भिडले होते. नवाज शरीफ समर्थक इमरान खान यांच्या घराबाहेर आंदोलन करतात तर दुसरीकडे इमरान खान समर्थक नवाज शरीफ यांच्या घराबाहेर आंदोलन करतात. आता या संघर्षाचं लोण इमरान खान यांची घटस्फोटित पत्नी जेमिमा गोल्डस्मिथ यांच्या घरापर्यंत पोहोचलं आहे. नवाज शरीफ यांच्या समर्थकांनी घराबाहेर आंदोलन केल्यानं आणि पोस्टर्स लावल्यानं जेमिमा गोल्डस्मिथ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोनिया गांधी यांच्या घरी काँग्रेसची तातडीची उच्चस्तरीय बैठक, प्रशांत किशोर यांची हजेरी, पक्षप्रवेशाच्या चर्चा? जेमिमा गोल्डस्मिथ यांनी एक ट्विट करुन या सर्व प्रकाराबद्दल मत व्यक्त केलं आहे. माझ्या घराबाहेर आंदोलन करणं, माझ्या मुलांना लक्ष्य करणं, सोशल मीडियावर यहुदी विरोधात शिवीगाळ करणं, हे सगळं ९० च्या दशकात लाहौरमध्ये आल्यासारखं वाटतंय, असं जेमिमा गोल्डस्मिथ म्हणाल्या आहेत. पाकिस्तानचे वरिष्ठ पत्रकार हामिद मीर यांच्या ट्विटला रिट्विट करत गोल्डस्मिथ यांनी त्याचं मत लिहिलं आहे. माझा, माझ्या मुलांचा पाकिस्तानच्या राजकारणाशी संबंध नाही, असं त्या म्हणाल्या आहेत.
पाकिस्तानी पत्रकार हामिद मीर यांनी एक ट्विट करुन पीटीआयनं नवाज शरीफ यांच्या घराबाहेरील आंदोलन करणं बंद करावं. तर, पीएमएल-एन यांनी जेमिमा खान यांच्या घराबाहेर आंदोलन करु नये असं म्हटलं आहे. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सांमजस्य दाखवलं पाहिजे, काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड फेकू नयेत, असं हामिद मीर म्हणाले आहेत.
१९९५ मध्ये इमरान खान आणि जेमिमा यांचा विवाह
इंग्लंडच्या नागरिक असणाऱ्या जेमिमा गोल्डस्मिथ यांनी १९९५ मध्ये इमरान खान यांच्याशी लग्न केलं होतं. दोघांनी ९ वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर २००४ मध्ये घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. जेमिमा यहुदी असल्यानं त्यांना पाकिस्ताना विरोधाला सामोरं जावं लागलंहोतं. इमरान खान यांनी त्याच कारणामुळं घटस्फोट घेतला होता. इमरान खान आणि जेमिमा गोल्डस्मिथ यांना सुलेमान आणि कासिम अशी दोन मुलं आहेत. ३० वर्षाच्या असताना जेमिमा गोल्डस्मिथ इंग्लंडला परत आल्या होत्या. By Poll Result : बंगाल ते बिहार, छत्तीसगडसह महाराष्ट्रात भाजपची पिछेहाट, पोटनिवडणुकांमध्ये विरोधकांची सरशी जेमिमा गोल्डस्मिथ यांनी पत्रकार म्हणून काम केलं होतं.गेल्या काही दिवसांमध्ये त्यांनी पाकिस्तानातील दिवसांबद्दल त्यांनी माहिती दिली होती. पाकिस्तानात असताना धमकी दिली जायची. खोट्या आरोपांखाली तुरुंगात पाठवण्याची धमकी दिली जात होती. प्राचीन वस्तुंची तस्करी केली गेल्याचा आरोप जेमिमा गोल्डस्मिथ यांच्यावर करण्यात आला होता. अशा प्रकारच्या गुन्ह्याखाली अटक झाल्यास त्या व्यक्तीला जामीन दिला जात नाही. त्यामुळं जेमिमा गोल्डस्मिथ यांनी पाकिस्तान सोडण्याचा निर्णय घेतला होता.