सांगली : सकाळपासून सांगली-मिरज शहर परिसरामध्ये उन्हाचा कडाका वाढला होता, त्यामुळे उकाड्याने नागरिक हैराण झालेल होते. परंतू दुपारनंतर सांगली आणि मिरज शहरामध्ये मुसळधार असा अवकाळी पाऊस पडला आहे. सुमारे अर्धा तास धुवाधार पाऊस पडला.

त्याचबरोबर विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊसही शहराच्या अनेक भागात झाला.त्यामुळे उकड्याने हैराण झालेल्या सांगलीकरांना अवकाळी पावसामुळे दिलासा मिळाला खरा. मात्र, अचानक झालेल्या या अवकाळी पावसाने सांगलीकरांची मोठी दैना उडाली, शनिवारच्या आठवड्या बाजारातील विक्रेत्यांची मोठी तारांबळ उडाली. अवकाळी झालेल्या पावसामुळे शहरातल्या अनेक सखल भागातील या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे पाहायला मिळाले.

Mumbai Indians Playing Xi: अर्जुन तेंडुलकर नव्हे तर रोहित शर्माने स्टार ऑलराउंडरला दिले स्थान
तर गेल्या आठ ते दहा दिवसांपासून जिल्ह्यात पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अनेक ठिकाणी या अवकाळी पाऊसाचा शेतीला मोठा फटका बसला आहे. प्रामुख्याने द्राक्ष शेती आणि फळबागांचे मोठे नुकसान अवकाळी पाऊसाने होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here