जालना : हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राज्यातलं राजकारण पेटलं आहे. अशात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेला वारंवार डिवचणाऱ्या भाजपनंतर आता मनसेनेही आपला झेंडा भगवा करीत हिंदुत्वाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. त्यामुळे भाजप व मनसेला शह देण्यासाठी शिवसेनाही सज्ज झाली असून, त्याचाच भाग म्हणून शिवसेना नेते तथा पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या अयोध्यावारीचे नियोजन करण्यात आले आहे.

अशात आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याआधीच विरोधकांनी टीका करणं सुरू केलं असलं तरी आमदार रोहित पवारांनी मात्र आदित्य ठाकरे यांची पाठराखण केली आहे. इतकंच नाहीतर निमंत्रण आल्यास मी सुद्धा त्यांच्यासोबत आयोध्या दौऱ्यावर जाईल असं रोहित पवारांनी म्हटलं आहे. जालन्यात बोलताना त्यांनी ही इच्छा बोलून दाखवली.

‘भाजप विजयी झाला असता तर…’, उत्तर कोल्हापूरच्या निकालावर चंद्रकांत पाटलांची पहिली प्रतिक्रिया
यामुळे आता आदित्य ठाकरे, रोहित पवारांना आमंत्रण देतात का? हे पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान, जर असं झालं तर राज्यात महाविकास आघाडीला हे फायद्याचं ठरू शकतं. कारण, वारंवार सरकार पडेल अशा चर्चा असताना राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या तरुण नेत्यांचा हिंदुत्वासाठी एकत्र दौरा होईल. त्यामुळे राहित पवारांनाही आमंत्रण येणार का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

दरम्यान, मे महिन्याच्या प्रारंभी आदित्य ठाकरे अयोध्येला जाऊन श्रीरामाचे दर्शन घेणार असून, हा दौरा यशस्वी करण्याची जबाबदारी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत शुक्रवारी आदित्य ठाकरेंच्या या दौऱ्याचा आढावा घेण्यात आला. हिंदुत्वाची जबाबदारी आता भाजपवर असल्याचे सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे हिंदुत्व खोटे असल्याचा दावा केला. आता मनसेनेही हिंदुत्वाच्या दिशेने आगेकूच करीत आपला झेंडा भगवा करून शिवसेनेच्या हिंदुत्वावरच शंका उपस्थित केली आहे.

‘नवनीत राणा भाजपची भाषा बोलतायत, पुन्हा BJP च्या तिकिटावर…’, रोहित पवारांचा टोला
राज ठाकरे अयोध्येचा दौरा करणार असल्याचीही चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेनेही हिंदुत्वाची आपली ओळख कायम ठेवण्यासाठी पुढाकार घेतला असून, त्यानुसार राज ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी आदित्य ठाकरे मे महिन्यात अयोध्येला भेट देऊन रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत. राऊत यांनी शुक्रवारी नाशिकमधील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन या अयोध्यावारीचे नियोजन करण्याचे निर्देश दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here