जळगाव : कंटेनर पार्क करत असताना खांबाला धडकल्याने कंटेनरमध्ये मध्ये विद्युतप्रवाह उतरून विजेचा जोरदार धक्क्याने चालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील खेडीजवळ एका पेट्रोल पंपावर घडली. जगदीश सिंह बोरा (वय ३८ रा. पिथोरागड उत्तराखंड) असं ट्रक चालकाचं नाव आहे.

कसा घडला सर्व प्रकार…

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जगदीश सिंह बोरा हा आर .जे ०९ जी.सी २५९७ या क्रमांकाचा कंटेनर घेऊन जळगाव वरून जात होता. दरम्यान सकाळी खेडी गावाजवळ असलेल्या एका पेट्रोल पंपावर तो थांबला. या पेट्रोल पंपावर एका बाजूला आपला कंटेनर उभा करत असताना पेट्रोल पंपाला लागूनच असलेल्या एका वीज खांबाला तसेच खांबावरील डीपीला कंटेनरचा धक्का लागला. आवाज आल्याने चालक जगदीश हा कंटेनरच्या खाली उतरला पुन्हा कंटेनरमध्ये मध्ये बसण्यास केला असता यादरम्यान डीपीवर ही स्फोट झाला व विजेच्या जोरदार धक्क्याने जगदीश हा जमिनीवर कोसळला व त्याचा जागीच मृत्यू झाला. मोठ्या आवाज झाल्याने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना कळवली . त्यानुसार एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी गाठून मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. खिशातील आधार कार्ड वरून मयत चालकाची ओळख पटली व त्याचे नाव जगदीश बोरा असल्याचे समोर आले. मयताच्या उत्तराखंड येथील कुटुंबियांना घटनेची माहिती देण्यात आली असून ते जळगाव कडे रवाना झाले आहेत. प्रकरणी पोलिसांची पुढील कारवाई सुरू आहे.

सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद…

‘नवनीत राणा भाजपची भाषा बोलतायत, पुन्हा BJP च्या तिकिटावर…’, रोहित पवारांचा टोला
सदरची धक्कादायक घटना पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. चालक हा कंटेनर पार्क करताना दिसत आहे. त्याला कंटेनर च्या मागे उभ्या असलेल्या वाहनांची एक जण माहिती देतोय त्यानंतर चालक आणि खाली उतरून कंटेनर व्यवस्थित पार्क झाला का ते पाहतो याचदरम्यान कंटेनरच्या उजव्या बाजूने काही तरी आवाज येतो म्हणून चालक पाहायला जातो. कंटेनर बाजूला घेण्यासाठी चढत असताना डीपीवर जोरदार स्फोट होतो व चालकाला विजेचा जोरदार धक्का लागून तो जमिनीवर कोसळतो. असे या सीसीटीव्ही कॅमेराच्या फुटेजमध्ये दिसून येत आहे.

Mumbai vs Lucknow Live IPL: मुंबई विरुद्ध लखनौ लाईव्ह अपडेट- मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला, कर्णधार रोहित शर्माने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here