मरीन ले पेन यांना एका महिलेनं प्रत्यु्त्तर देत त्या करत असलेला दावा चुकीचा असल्याचं म्हटलं होतं. त्या महिलेनं हिजाब घालण्यास सुरुवात केली तेव्हा मी वयस्कर झाले होते, असं सांगितलं. हिजाब घालणं हे माझ्यासाठी मी आजीच्या वयाची झाली हे सांगणारे आहे, असं ती महिला म्हणाली. माझे वडील फ्रान्सच्या सैन्यात १५ वर्ष काम करत होते, असं देखील ती महिला म्हणाली. तर, मरीन ले पेन यांनी फ्रान्समध्ये काही ठिकाणं आहेत तिथं महिला हिजाब घालत नाहीत. हिजाब घातल्यास लोक त्यांच्यापासून दूर राहतात असं म्हटलंय.
२४ एप्रिलला निवडणूक
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मरीन ले पेन यांनी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या समोर आव्हान उभं केलं आहे. फ्रान्समध्ये २४ एप्रिलला निवडणूक होणार आहे. मॅक्रॉन यांनी धार्मिक पोशाखांवर बंदी घालणार नसल्याचं म्हटलं आहे. मात्र, दुसरीकडे मशीदी बंद करण्याचं आणि इस्लामिक समुदायवर नियंत्रण ठेवण्याचं काम केलं आहे. यामुळं इमॅन्युअल मॅक्रॉन यांना जगभरातून टीकेला सामोरं जावं लागलं होतं.
मरीन ले पेन यांनी सार्वजनिक ठिकाणी हिजाब घातल्यास वाहतूक नियमांप्रमाणं दंड लावण्याचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी प्रस्ताव फेटाळला आहे. त्यांनी यासंदर्भातील भाष्य करण्यास नकार दिला आहे. सध्याच्या कायद्यात कोणताही बदल करणार नसून शाळांमध्ये हिजाब घालण्यास निर्बंध लावण्यासंदर्भात त्यांनी भाष्य केलं आहे.