लाहोर : पाकिस्तानातील (Pakistan) राजकीय वाद विवाद संपण्याची चिन्ह दिसत नाहीत. पाकिस्तानातून आता मोठी बातमी येत आहे. पाकिस्तानच्या पंजाब विधानसभेत (Punjab Assembly Uproar) मोठा गोंधळ झाल्याची घटना घडली आहे. विधानसभेच्या उपाध्यक्षांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. विधानसभा उपाध्यक्षांना मारहाण झाल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. उपाध्यक्षांना कानशिलात मारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इम्रान खान यांच्या पीटीआयच्या (PTI) नेत्यांवर थप्पड मारण्याचा आरोप करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ज्या नेत्यांवर उपाध्यक्षांना कानशिलात मारण्याचा आरोप आहे ते इम्रान खान यांच्या पीटीआयचे सदस्य आहेत. लाहोर हायकोर्टाच्या आदेशानुसार पंजाब विधानसभेला प्रातांच्या नव्या मुख्यमंत्र्यासाठी मतदान १६ जुलैपूर्वी करण्यास सांगण्यात आलं होतं. यापूर्वीच पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि सध्याचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या समर्थकांमधील कथित मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
भारताला डिवचल्यास सोडणार नाही, राजनाथ सिंह यांचा अमेरिकेतून चीनला थेट इशारा
पाकिस्तानातील सत्ता संघर्षानंतर इम्रान खान यांना सत्ता सोडावी लागली होती. यानंतर पाकिस्तानच्या पंतप्रधान पदावर शाहबाज शरीफ याची निवड झाली होती. पाकिस्तानच्या पीपल्स पार्टीचे राजा परवेज यांची नॅशनल असेंब्लीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर, इम्रान खान यांच्या सूचनेनुसार संसद भंग करण्याचा निर्णय घेणारे उपसभापती कासिम सूरी यांनी राजीनामा दिला आहे. पाकिस्तानात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला सत्तासंघर्ष ९ एप्रिलला संपुष्ठात आला होता. ९ एप्रिलला नॅशनल असेम्ब्लीत अविश्वास ठरावावर मतदान झालं त्यात इमरान खान यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.
पाकिस्तानातील भांडण इंग्लंडमध्ये, इमरान खानच्या घटस्फोटित पत्नीच्या घराबाहेर पोस्टर्स आंदोलन
पाकिस्तानातील सत्ता गमावल्यानंतर इम्रान खान यांनी देशभरातील विविध भागात सभांचं आयोजन केलं आहे. पेशावरमध्ये इम्रान खान यांनी सभा घेतली होती. पाकिस्तानसाठी जगणार आणि मरणार असल्याचं ते म्हणाले होते. पंतप्रधानपद सोडल्यानंतर इम्रान खान यांनी नॅशनल असेंब्लीतील सर्व खासदारांना राजीनामे द्यायला सांगितलं होतं. इमरान खान यांच्या पीटीआय पक्षाचे १५५ सदस्य निवडून आले होते. त्यापैकी २० जणांनी विरोधी पक्षांशी हातमिळवणी केली होती. तर, १२३ सदस्यांनी राजीनामे दिले होते. १२ सदस्यांचा कोणताही निर्णय झालेला नव्हता. पीटीआयच्या १२३ खासदारांचे राजीनामे पाकिस्तानच्या संसदेनं स्वीकारले होते. तर, बंडखोर सदस्यांवर कारवाई करण्याच पत्र इमरान खान यांनी पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाला लिहिलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here