पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत अखेर पुण्यातील खालकर मंदिरात महाआरती पार पडली आहे. तसंच यावेळी हनुमान चालिसेचं पठणही करण्यात आलं. मंदिर परिसरात मनसे पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. (Raj Thackeray Pune News)

राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मशिदीवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेत हे भोंगे हटवले नाहीत तर मशिदीसमोर हनुमान चालिसेचं पठण करण्याचे आदेश मनसेच्या कार्यकर्त्यांना दिले होते. राज यांच्या या भूमिकेवर राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांसह विविध संघटनांनी जोरदार टीका केली. या टीकेनंतर आक्रमक झालेल्या राज यांनी आपल्या राजकीय विरोधकांना आव्हान देत स्वत:च मैदानात उतरण्याची भूमिका घेतली आणि हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर पुण्यात हनुमान चालिसा पठणाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आज पुण्यातील खालकर मंदिरात पोहोचले आणि त्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांकडून हनुमान चालिसेचं पठण करण्यात आलं.

Communal Violence: जातीय हिंसाचारावर पंतप्रधान गप्प का?; पवार, सोनियांसह १३ नेत्यांचा सवाल

दरम्यान, या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी स्वत: रस्त्यावर उतरत सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांना आव्हान दिल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आगामी काळात हा राजकीय संघर्ष आणखी टोकदार होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here