धुळे : धुळे शहरातील एमआयडीसीमधील एका कंपनीला भीषण आग लागल्याची घटना आज सायंकाळी घडली. या आगीत कंपनीचं गोडाऊन जळून खाक झाल्याने ५ ते ६ कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा दावा करण्यात येत आहे. सुदैवाने आग दुर्घटनेत कसलीही जीवितहानी झाली नाही. (Dhule Fire Incident)

मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी ५.३० च्या सुमारास मधूर फूड प्रोडक्शन या कंपनीत असलेल्या बारदानच्या गोडाऊनला आग लागली. शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे. आगीत जवळपास ६ कोटी रुपयांचे बारदान जळून खाक झाल्याचा अंदाज मधूर कंपनीचे व्यवस्थापक संदीप अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे.

Delhi Violence: आता हनुमान जयंती शोभायात्रेत हिंसाचार; दिल्लीत घडली धक्कादायक घटना

आगीची माहिती मिळताच ८ ते ९ अग्निशमन बंब पाचारण करण्यात आले. तसंच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. सायंकाळी उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाकडून प्रयत्न सुरू होते.

दरम्यान, आगीचे मोठमोठे लोळ उसळू लागल्यानंतर स्थानिकांनी एमआयडीसी परिसरात मोठी गर्दी केली होती. धुळे एमआयडीसमध्ये आपत्कालीन परिस्थितीसाठी कुठलीही स्वतंत्र यंत्रणा नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here